Mumbai Expressway News : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईहुन जाणाऱ्या एका महत्वकांक्षी महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की Mumbai-Nagpur समृद्धी महामार्ग अर्थातच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे.
खरे तर या महामार्ग प्रकल्प अंतर्गत राजधानी ते उपराजधानी दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग विकसित करण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. या महामार्गाचा बहुतांशी भाग हा वाहतुकीसाठी सुरू आहे.
नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला होता.
यानंतर जुलै 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा म्हणजेच शिर्डी ते भरवीर हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. तसेच या चालू वर्षात या महामार्गाचा 25 किलोमीटर लांबीचा म्हणजेच भरवीर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
आता या महामार्गाचा शेवटचा चौथा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग कार्यान्वित होणार आहे.
यानंतर राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर हा प्रवास अवघ्या सात तासात पूर्ण होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात 16 ब्रिज आणि चार बोगदे विकसित केले जात आहेत. या टप्प्याचे आतापर्यंत 95% पर्यंत चे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील 15 ब्रिज आणि चार बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
एका ब्रिजचे काम बाकी असून ते देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या ब्रिजचे काम हे खूपच आव्हानात्मक आहे एवढे नक्की. खर्डीजवळ हा ब्रिज तयार केला जात आहे. या पुलाचे काम आव्हानात्मक आहे मात्र लवकरात लवकर हे देखील काम पूर्ण करण्याचा मानस राज्य रस्ते विकास महामंडळाने बोलून दाखवला आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास सात ते आठ तासात पूर्ण होणार आहे. तसेच मुंबई ते शिर्डी हा प्रवास पाच तासात पूर्ण होणार आहे. सध्या मुंबई ते शिर्डीच्या प्रवासासाठी आठ तासांपर्यंतचा कालावधी लागत आहे.
मात्र समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू झाल्यानंतर मुंबई ते शिर्डी प्रवासातील तीन तासांचा वेळ वाचणार आहे. यामुळे साई भक्तांना जलद गतीने साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. यामुळे समृद्धी महामार्ग श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या भाविकांसाठी देखील मोठा फायद्याचा ठरणार आहे.