Mumbai Expressway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईकरांना लवकरच एका महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
विविध महामार्गाची कामे केंद्र शासनाच्या माध्यमातून केली जात आहेत. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई हे दोन शहर परस्परांना थेट रस्ते मार्गाने जोडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मुंबई-दिल्ली महामार्गाचा देखील समावेश होतो.
हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जातोय, याची एकूण लांबी 1386 किलोमीटर एवढी आहे. या मार्गासाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली या दोन शहरांमधील अंतर दोनशे किलोमीटरने कमी होणार आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास मात्र 12 तासात या महामार्गाने शक्य होणार आहे. यामुळे मुंबईकरांचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे हा महामार्ग केव्हा पूर्ण होतो याकडे लक्ष लागून आहे. अशातच आता या महामार्गाच्या उद्घाटनाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
केव्हा पूर्ण होणार काम ?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-दिल्ली महामार्गाचे काम पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. खरंतर आगामी वर्षात लोकसभा आणि देशातील काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत या महामार्गाचे पूर्ण काम होईल आणि त्यानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे.
आतापर्यंत किती काम झाले ?
मुंबई-दिल्ली महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. सोहना-दोसा-लालसोट हा 246 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू झाला असून या पहिल्या टप्प्यामुळे दिल्ली ते जयपूर हा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळाली आहे.
खरंतर, हा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वी दिल्ली ते जयपूर प्रवास करण्यासाठी पाच तासांपेक्षा जास्तीचा वेळ लागत होता. पण जेव्हापासून हा पहिला टप्पा सुरू झाला आहे तेव्हापासून जयपुर ते दिल्ली हा प्रवास मात्र साडेतीन तासात पूर्ण होत आहे. अर्थातच प्रवासाच्या वेळेत तब्बल दीड तासांची बचत झाली आहे.