ब्रेकिंग ! तब्बल 1400 कोटी रुपये खर्च करून तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, राजधानी मुंबईसह ‘या’ भागातील नागरिकांना मिळणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. देशात विविध मोठमोठ्या महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गांचे कामे केली जात आहेत. राज्याचा कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक विकास सुनिश्चित करण्यासाठी दळणवळण व्यवस्था सुधारणे अतिशय आवश्यक आहे.

हेच कारण आहे की शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्याची आणि देशाची दळणवळण व्यवस्था मजबूत केली जात आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परीयोजनेअंतर्गत विविध महामार्ग विकसित होत आहेत. यामध्ये दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चा देखील समावेश केला जातो. हा महामार्ग राजधानी मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेष लाभप्रद ठरणार आहे.

या महामार्गामुळे दिल्लीची कनेक्टिव्हिटी सुलभ होणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त बारा तासात पूर्ण करता येणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर दिल्ली दूर नही है जनाब असंच म्हणावं लागणार आहे. दरम्यान आता या महामार्गाबाबतच एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आता एका महत्वाच्या महामार्गासोबत कनेक्ट केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा होऊ घातलेला महामार्ग ट्रान्स हरियाणा एक्स्प्रेस वे ला जोडला जाणार आहे. यासाठी जवळपास 86 किमी लांबीचा नवीन ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे बांधला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे या नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे साठी तब्बल 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

म्हणजे फक्त 86 किलोमीटरच्या अंतरासाठी 1400 कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.हरियाणातील नारनौल ते राजस्थानमधील अलवरपर्यंत हा एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या नवीन मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हा नवीन महामार्ग अवघ्या दोन वर्षांच्या काळात बांधून तयार केला जाणार आहे. यामुळे देशातील विविध राज्यातील नागरिकांची आर्थिक राजधानी सोबत कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. साहजिकच याचा मुंबई आणि आपल्या महाराष्ट्राला देखील मोठा लाभ मिळणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील वाहने दिल्लीला न जाता थेट मुंबईला जाऊ शकणार आहेत.

यामुळे या संबंधित राज्यातील प्रवाशांना मुंबईकडील प्रवास अधिक जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. यामुळे इंधनाच्या खर्चात बचत होणार आहे वेळेत बचत होणार आहे. विशेष म्हणजे या संबंधित राज्यातील नागरिकांचा प्रवास यामुळे आरामदायी होणार आहे. सोबतच हा 1400 कोटी रुपयाचा नवीन महामार्ग दिल्ली-एनसीआरवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यात मोलाची भूमिका निभावणार आहे.

यामुळे राजधानी मुंबईची उत्तर भारतासोबत कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा महामार्ग मुंबईच्या विकासात हातभार लावेल सोबतच उत्तर भारतातील विकास देखील यामुळे सुनिश्चित होणार आहे. या मार्गामुळे उत्तर भारत ते मुंबई हा प्रवास सोपा होणार आहे. NHAI प्रकल्प संचालक मुकेश कुमार मीना यांनी सांगितले की, या मार्गाच्या कामाची दोन पॅकेजेसमध्ये विभागणी केली जाणार आहे. हा मार्ग पणियाला-बदौदामियो एक्सप्रेस वे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जाईल.

हा मार्ग हरियाणातील नारनौलमधील पनियाला येथून सुरू होईल आणि अलवर जिल्ह्यातील बडोदामिया येथे संपणार आहे. हा एक्सप्रेसवे ट्रान्स-हरियाणा एक्सप्रेसवेच्या दक्षिणेकडील टोकाला बडोदामेव येथील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला जोडला जाईल. अल्वरमधील दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग ते पणियालजवळील महामार्ग 148B ला एक रस्ता जोडेल. महामार्ग 148B ट्रान्स हरियाणा एक्सप्रेसवे (हायवे-152D)ला कनेक्ट आहे.

यामुळे दोन द्रुतगती मार्ग कनेक्ट होणार आहेत. हा मार्ग उत्तर भारत आणि मुंबई दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. नवीन कनेक्टिव्हिटीमुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थान येथून येणाऱ्या वाहनांसाठी मुंबईला जाण्याचा छोटा मार्ग उपलब्ध होणार आहे. निश्चितच हा महामार्ग पूर्ण झाला तर देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला देखील फायदा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा