Mumbai Delhi Expressway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन महामार्गाची उभारणी केली जात आहे. या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित व्हावा या दृष्टीने मुंबई-दिल्ली महामार्ग तयार केला जात आहे.
या दोन्ही शहरादरम्यान 1389 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वाधिक लांब महामार्गाची निर्मिती केली जात आहे. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. हा संपूर्ण महामार्ग बांधून झाल्यानंतर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास फक्त 12 तासात पूर्ण करता येणार आहे.
एकंदरीत हा महामार्ग राजधानी दिल्लीला महाराष्ट्राच्या आणखी जवळ आणणार आहे. दरम्यान या महामार्ग संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या महामार्गाअंतर्गत विकसित होत असलेले 60 किलोमीटर लांबीचे कनेक्टरचे काम येत्या नवीन वर्षात पूर्ण होणार आहे.
खरं तर या कनेक्टरचे काम पुढील वर्षी मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता या निर्धारित वेळेत या कनेक्टरचे काम पूर्ण होणार नाही असे सांगितले जात आहे. तथापि या कनेक्टरचे काम नवीन वर्षातचं पूर्ण होईल पण हे काम पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पूर्ण होऊ शकते अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
खरंतर देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडण्यासाठी या प्रकल्पांतर्गत यमुना कालव्याच्या काठावर असलेल्या आश्रमाजवळील गोल चक्कर पार्कपासून फरिदाबाद, बल्लभगड मार्गे गुरुग्रामच्या सीमेवर वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेपर्यंत 60 किमी लांबीचा रस्ता तयार केला जाणार आहे.
या 60 किलोमीटर लांबीच्या कनेक्टरचे काम मात्र मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. याचे काम नवीन वर्षात म्हणजेच मार्च 2024 ऐवजी ऑगस्ट 2024 पर्यंत या कनेक्टरचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे.
हा टप्पा पूर्ण झाला तर मुंबई दिल्ली महामार्गाचे एक महत्त्वाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आता ऑगस्टपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होते का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.