Mumbai BMC Job : राजधानी मुंबईमध्ये नोकरी शोधू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई महानगरपालिका अर्थातच बीएमसी च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. महानगरपालिकेने डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या सहाशेहून अधिक रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत.
यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! पुण्यातील ‘हा’ बहुचर्चित उड्डाणपूल ‘या’ दिवशी सुरु होणार; नितीन गडकरींनीच दिली माहिती
कोणत्या पदासाठी आयोजित केली भरती?
मुंबई महानगरपालिकेमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणजे संगणक सहायक या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
अर्ज कसा करायचा?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. portal.mcgm.gov.in या बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर संबंधित उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?
डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी 13 मार्च 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 मार्च 2023 हे ठेवण्यात आली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता राजधानीत ‘वंदे भारत लोकल’ ट्रेन धावणार; रेल्वे मॅनेजरची माहिती
शैक्षणिक पात्रता? अन वयोमर्यादा
या पदासाठी 45 वर्षे पर्यंतच्या उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. कोणत्याही शाखेतला पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. सोबतच उमेदवार आणि मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून एम एस सी आय टी हा कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक असून तत्सम प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. याशिवाय मराठी ३० (शब्द प्रति मिनिट) व इंग्रजी ४० (शब्द प्रति मिनिट) या वेगाने टायपिंगचा कोर्स केलेला असणे अनिवार्य राहणार आहे.
किती मिळणार पगार?
या पदासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 18 हजार रुपये प्रतिमहा इतकं वेतन दिल जाणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ ठिकाणी थांबणार; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली मंजुरी