मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! ‘या’ मार्गावरील ही बस सेवा होणार कायमची बंद, कारण काय? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Best News : राजधानी मुंबई हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मुंबई शहराला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे. शिवाय महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी म्हणून हे शहर गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मुंबई शहरात लाखों पर्यटक येतात, मुंबईचे वैभव आपल्या नजरेत कैद करतात.

विशेष म्हणजे शासन आणि प्रशासनाकडून मुंबईमध्ये आलेल्या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. बेस्टच्या माध्यमातून देखील पर्यटकांचा प्रवास चांगला व्हावा, त्यांना मुंबई शहराचे दर्शन चांगल्या तऱ्हेने घेता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून बेस्टच्या माध्यमातून डबल डेकर ओपन डबल डेकर बस सुरू करण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ही डबल डेकर ओपन बस 1997 मध्ये सुरू करण्यात आली होती. अर्थातच या बसला जवळपास 23 वर्ष झाली आहेत. ही बस नॉन एसी आहे. यात अप्पर डेक आणि लोअर डेक असतात. अप्पर डेकचे भाडे वेगळे आणि लोअर डेक मधले भाडे वेगळे असते. अप्पर डेक ओपन असल्याने यातून जीवाची मुंबई खुल्या आभाळाखाली पाहता येते. जेव्हा ही गाडी सुरु झाली तेव्हा मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट दिली जात असे.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे 2021 पासून दक्षिण मुंबईमधील पर्यटन स्थळांना या बसच्या माध्यमातून भेटी दिल्या जात आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ही गाडी सकाळी आणि दुपारी चालवली जात असे मात्र आता उकाड्यामुळे ही गाडी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत चालवली जात आहे.

या गाडीतून महिन्याकाठी जवळपास वीस हजाराच्या आसपास पर्यटक जीवाच्या मुंबईचे दर्शन घेत आहेत. मात्र आता या बस बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे मुंबईचे वैभव पर्यटकांना दाखवणाऱ्या या डबल डेकर ओपन डेक बसला सेवेतून हद्दपार केले जाणार आहे.

या गाडीला सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. सध्या बेस्ट कडे 3 डबल डेकर ओपन डेक बस आहेत. ज्या आता टप्प्याटप्प्याने बेस्ट सेवेतून हद्दपार केल्या जाणार आहेत. बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्र टाइम्स या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. सदर अधिकाऱ्यावर जर विश्वास ठेवला तर 16 सप्टेंबरला पहिली बस सेवेतून काढण्यात येईल.

त्यानंतर 25 सप्टेंबरला दुसरी आणि 5 ऑक्टोबरला शेवटची बस सेवेतून बाद केली जाणार आहे. या बस हद्दपार झाल्या की डबल डेकर एसी बस पर्यटन सेवेत आणू असा निर्णय झाला होता. पण आता यासाठीची निविदा देखील रद्द करण्यात आली आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यानंतर बेस्टकडून मुंबई दर्शनासाठी कोणतीच बस सेवा चालवली जाणार नाही असे स्पष्ट होत आहे.

कोणत्या पर्यटन स्थळांना भेट द्यायची डबल डेकर ओपन डेक बस 

मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही बस प्रामुख्याने सुरू करण्यात आली होती. या बसला सुरुवातीच्या टप्प्यात पर्यटकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला होता. विशेष म्हणजे आताही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या महिन्याकाठी वीस हजार पर्यटक या बसमधून प्रवास करत आहेत. ही बस दक्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एन.सी.पी.ए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापिठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, रिझव्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस या मुंबई शहरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देत आहे.