खुशखबर..! मुंबई-बेंगलोर महामार्गाचे ‘या’ भागात होणार रुंदीकरण, पुणे, पिंपरी चिंचवडकरांना मिळणार दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Bangalore Highway : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या काही दशकात मोठा विकास झाला आहे. विशेषता पिंपरी चिंचवड शहराचा विकास अलीकडे मोठ्या प्रमाणावर झाला असून शहरातील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याची वाहतूक व्यवस्था मात्र तोकडी सिद्ध होत आहे. सध्याचे रस्ते हे वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. परिणामी शहरात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत वाहतूक कोंडी फोडून नागरिकांचा प्रवास गतिमान करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

अशातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधून जाणारा मुंबई बेंगलोर महामार्ग रुंद केला जाणार आहे. हा मार्ग पिंपरी चिंचवड मधील किवळे ते वाकडदरम्यान रुंद केला जाणार आहे. या भागात या महामार्गालगत सेवा रस्ता तयार केला जाणार आहे. हा सर्विस रोड 12 मीटर रुंद केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गात जमिनी जाणाऱ्या जमिनधारकांना हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर), चटई निर्देशांकच्या (एफएसआय) माध्यमातून परतावा देण्यात येणार आहे. यासाठीची भूसंपादनाची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जाणार आहे.

महापालिकेच्या विकास योजनेमधील जागा ताब्यात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हा महामार्ग वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी, किवळे या भागातुन जात असून आता या भागातील नागरिकांचा प्रवास गतिमान करण्यासाठी या महामार्ग सर्विस रोड केला जाणार आहे.

साहजिकच सर्विस रोडमुळे या भागातील नागरिकांचा प्रवास गतिमान होणार आहे. या भागात १२ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जर टीडीआर किंवा एफएसआयच्या माध्यमातून परतावा मिळाला नाही तर भूसंपादन कायद्याने निवाडा जाहीर केला जाईल.

अशावेळी टीडीआर, एफएसआयचा पर्याय जमीन मालकास उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर केवळ भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा रोख स्वरुपातील मोबदला दिला जाणार आहे. निश्चितच किवळे ते वाकड दरम्यान 12 मीटरचा सर्विस रोड तयार झाला तर या परिसरातील विकासाला चालना मिळणार असून परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी मधून दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा