Mumbai And Pune Railway : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. यामुळे रेल्वेच्या माध्यमातून अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवल्या जातात. विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा प्रयत्न रेल्वे कडून केला जातो. असाच प्रयत्न गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत झाला आहे.
दरम्यान मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई आणि पुण्यातून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई ते रीवा आणि पुणे ते जबलपूर या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला असून या निर्णयामुळे मुंबई ते रिवा आणि पुणे ते जबलपूर यादरम्यानचा प्रवास सोयीचा होणार आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही गाड्यांना कधीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कधीपर्यंत धावणार CSMT – रिवा विशेष एक्सप्रेस ट्रेन
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून पर्यंत धावणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रीवा विशेष एक्सप्रेस ट्रेन 27 सप्टेंबर 2024 पर्यंत धावणार आहे. ही गाडी मुंबई येथील सीएसएमटी येथून प्रत्येक शुक्रवारी सोडली जाणार आहे.
तसेच 27 जून पर्यंत धावणारी रीवा ते मुंबई विशेष एक्सप्रेस ट्रेन 26 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. ही गाडी रिवा रेल्वे स्टेशन वरून गुरुवारी सोडली जाणार आहे.
कधीपर्यंत धावणार पुणे जबलपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन
पुणे-जबलपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन एक जुलै पर्यंत धावणार होती आता मात्र ही ट्रेन 30 सप्टेंबर पर्यंत धावणार आहे. ही गाडी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
तसेच जबलपूर-पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन 30 जून पर्यंत धावणार होती पण ही ट्रेन आता 29 सप्टेंबर पर्यंत धावणार आहे. ही गाडी जबलपूर रेल्वे स्थानकावरून रविवारी सोडली जाणार आहे. यामुळे पुणे ते जबलपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.