गुड न्युज ! मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यान रोजाना सुरू होणार विमानसेवा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Airlines : महाराष्ट्रातील विमान प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ते मुंबई दरम्यान हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे.

खरंतर, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापूर मधील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हवाईमार्गाने कोल्हापूर मध्ये येतात. यामध्ये मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच कोल्हापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांची संख्या देखील खूपच आहे. यामध्ये हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील उल्लेखनीय आहे. मात्र असे असले तरी सध्या स्थितीला कोल्हापूर ते मुंबई यादरम्यान सुरू असलेली विमानसेवा आठवड्यातून केवळ चार दिवस सुरू आहे.

बेंगलोर-कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सध्या स्थितीला आठवड्यातून मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवसांसाठी सुरू आहे. यामुळे कोल्हापूर येथील हवाईमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून ही विमान सेवा रोजाना सुरू करण्याची मागणी केली जात होती.

दरम्यान प्रवाशांच्या या मागणीला आता यश मिळाले आहे. कारण की, ही विमानसेवा आता आठवड्यातून सातही दिवस सुरू होणार आहे. ही विमानसेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी देखील या चालू महिन्यातच होणार अशी महत्त्वपूर्ण माहिती एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार एअरलाइन्सकडून ही सेवा रोजाना पुरवली जाणार आहे. यामुळे साहजिकच कोल्हापूर समवेतच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील हवाई मार्गे मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केव्हा सुरू होणार नियमित विमानसेवा?

याबाबत स्टार एअरलाइन्सकडून सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही विमानसेवा 15 ऑक्टोबर 2023 पासून नियमित केली जाणार आहे. म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून बेंगलोर-कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा रोज सुरू होणार आहे.

कसं असणार वेळापत्रक ?

रोज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी बेंगलोर विमानतळावरून विमान उड्डाणं भरेल, हे विमान दहा वाजून वीस मिनिटांनी कोल्हापूरला येईल आणि कोल्हापूर येथून हे विमान दहा वाजून पन्नास मिनिटांनी राजधानी मुंबईच्या दिशेने उड्डाण भरेल आणि अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर, हे विमान तीन वाजून 40 मिनिटांनी राजधानी मुंबई येथून उड्डाण भरेल आणि चार वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. पुढे कोल्हापूर येथून हे विमान पाच वाजून दहा मिनिटांनी बेंगलोरसाठी उड्डाण भरेल आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांच्या आसपास बेंगलोर विमानतळावर लँड होणार आहे. निश्चितच या विमान सेवेमुळे कोल्हापूरकरांचा मुंबई आणि बेंगलोरकडील प्रवास जलद होणार असून आता या दोन्ही शहरांना रोजाना भेट देता येणार आहे.