मुंबई ते अहमदाबाद प्रवास होणार जलद! बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा ‘या’ महिन्यात होणार सुरु, रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Ahmedabad Bullet Train : देशात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी देशात आता वंदे भारत एक्सप्रेससारखी हाय स्पीड ट्रेन देखील सुरू झाली आहे.

तसेच राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर सह देशभरातील विविध शहरांमध्ये मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता देशात बुलेट ट्रेन देखील धावणार आहे.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार असून सद्यस्थितीला या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून हा प्रकल्प पूर्ण केला जात आहे.

दरम्यान या प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णव यांनी या प्रकल्पाचा पहिला टप्पा केव्हा सुरू होणार याबाबत एक कामाची अपडेट दिली आहे.

केव्हा सुरु होणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चा पहिला टप्पा

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ५०८ किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन मार्ग विकसित होत आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर ताशी 320 किलोमीटरने बुलेट ट्रेन धावणार आहे.

यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास दोन तास 7 मिनिटात पूर्ण होणार असा दावा केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई ही चार नवीन स्थानके तयार केली जाणार आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पाअंतर्गत २१ नोव्हेंबरपर्यंत २५१.४० किलोमीटर अंतराचे पिलर बनवण्यात आले आहेत. तसेच १०३.२४ किलोमीटरचं सुपर स्ट्रक्चर देखील तयार आहे.

हा टप्पा एकूण ५० किलोमीटर लांबीचा आहे. तसेचं गुजरातमधील वलसाड, नवसारी, सूरत, बडोदरा, आनंद जिल्ह्यात या प्रकल्पाच्या पुलांची कामे देखील पूर्ण झाली आहेत.

दरम्यान या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच बिल्लीमोरा ते सुरत हा येत्या दोन ते अडीच वर्षात सुरू होणार आहे.

हा पहिला टप्पा ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी दिली आहे. यामुळे देशाला लवकरच पहिली वहिली बुलेट ट्रेनची भेट मिळणार असल्याचे चित्र आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा