मोठी बातमी ! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पडले बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Ahmedabad Bullet Train Project : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने बुलेट ट्रेनची घोषणा केली होती. यानुसार देशात एकूण सात महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. सुरुवातीला मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याचे नियोजन आहे.

सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा प्रकल्प दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

दरम्यान, या प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे काम बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

खरेतर राजधानी मुंबईत प्रदूषणाचा स्तर कमालीचा वाढला आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी बांधकाम आणि विकासकामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनाचे पालन करून बांधकाम आणि विकासकामे करणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनेचे पालन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये होत नव्हते.

त्यामुळे हा प्रकल्प करण्यासाठी महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीस वर आता कारवाई पूर्ण झाली असून सोमवारपासून हे काम बंद करण्यात आले आहे.

या बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनचे स्थानक विकसित केले जात आहे.हे या प्रकल्पाचे सुरुवातीचे स्थानक असून हे एक भुयारी स्थानक आहे.

नुकतेच या स्थानकाच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या कामात पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जात नव्हती.

प्रकल्पाच्या ठिकाणी पालिकेच्या सहआयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानुसार बुलेट ट्रेन प्रकल्प प्रशासनाला मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पण महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन येथे झाले नाही परिणामी या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आता थांबवण्यात आले आहे. परंतु जेव्हा मार्गदर्शक सूचनेचे केले जाईल तेव्हा या प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा सुरू करता येणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा