Mumbai Ahmedabad Bullet Train : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारच्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रोजेक्ट संदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. खरेतर, येत्या काही वर्षात आपल्या देशात बुलेट ट्रेन रुळावर धावणार आहे. सध्या देशातील पहिल्या बुलेट प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प विकसित केला जात असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे. 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन रुळावर येण्याची शक्यता आहे.
म्हणजेच या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा 2026 पर्यंत कार्यान्वित होणार असा अंदाज आहे. हा प्रकल्प दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने केले जात आहे.
विशेष म्हणजे पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच देशात आणखी एका मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचे काम सुरू होणार आहे. सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे.
हा बुलेट ट्रेन प्रकल्प बिहार आणि उत्तर प्रदेश मधून जाणार आहे. यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या विकासाला चालना मिळणार आहे. बिहारमधील गया, पाटणा आणि बक्सर जिल्ह्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
या बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत बिहारमधील या तिन्ही जिल्ह्यात स्पेशल स्थानक तयार केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या ट्रॅकचा बिहार मधील रूट देखील फायनल करण्यात आला आहे.
यामुळे लवकरच या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन सुरू होणार आहे. याशिवाय येत्या दोन महिन्यांनी अर्थातच ऑगस्टमध्ये पाटणा जिल्ह्यातील स्थानकाची जागा निश्चित करण्यासाठी एक टीम पाटण्याला पोहोचणार आहे.
या प्रकल्पामुळे पाटणा ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या पाटणा ते दिल्ली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 17 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय.
मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा कालावधी तीन तासांवर येणार आहे. म्हणजे भविष्यात पाटणा ते दिल्ली हा प्रवास तीन तासात होणार आहे. निश्चितच यामुळे बिहारच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.