मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन : प्रकल्पाचे 100 किलोमीटरचे बांधकाम पूर्ण, पहिला टप्पा ‘या’वर्षी होणार सुरु ! वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Ahmedabad Bullet Train : देशात 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात बुलेट ट्रेनची घोषणा केली होती. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनची घोषणा केली आणि अवघ्या काही वर्षाच्या काळातच या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी देखील करण्यात आली.

खरे तर आपल्या देशात एकूण सात महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे.

हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पाला जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीद्वारे अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन चा मार्ग तयार होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण करता येणार आहे. या मार्गावर तीनशे पन्नास किलोमीटर प्रतितास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार असा दावा केला जात आहे.

या प्रकल्पांतर्गत नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात गुजराधील सूरतमध्ये राष्ट्रीय महामार्ग-53 वर पहिला 70 मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीरित्या बांधून प्रकल्पातील पहिला मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची किमया साधली होती.

याशिवाय गुजरात मधील वलसाड येथे 350 मीटर लांबीच्या बोगदा फोडण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. अशातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाच्या कामासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्प अंतर्गत 251.40 किमी लांबीचे पायर्स आणि 103.24 किमी मार्गावरील पूल बांधण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

NHSRCL म्हणजेच नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, बुलेट ट्रेन प्रकल्पातील 40 मीटर लांब फुल स्पॅन बॉक्स गर्डर्स आणि सेगमेंट गर्डर्स लाँच करण्यात आले आहेत. या प्रकल्पातील 100 किमी मार्गाच्या बांधकामाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पासाठी 250 किलोमीटरच्या घाटाचे कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात सहा नद्यांवर पूल बांधले जाणार आहेत. पण हे सर्व पूल गुजरातमध्येचं तयार केले जाणार आहेत.

एकंदरीत या प्रकल्पाचे काम आता युद्ध पातळीवर सुरू असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थात गुजरातमधील सुरत-बिलीमोरा सेक्शन याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे.

तसेच या पहिल्या टप्प्यावर 2026 मध्ये बुलेट ट्रेन सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. यामुळे आता हा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा नियोजित वेळेत सुरू होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा