ब्रेकिंग ! मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प 25 डिसेंबरला सुरू होणार नाही; केव्हा सुरु होणार MTHL, किती टोल लागणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MTHL Project Toll Rate : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईत विविध रस्ते विकासाच्या कामांनी गती पकडली आहे. मुंबईमध्ये रस्ते विकासाची विविध प्रकल्प पूर्ण केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो.

या प्रकल्पाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत शिवडी आणि न्हावा शेवा दरम्यान 23 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू तयार केला जात आहे. विशेष म्हणजे हा सागरी सेतू देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू म्हणून ओळखला जाणार आहे.

दरम्यान या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असे वृत्त समोर आले होते. राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त 25 डिसेंबरला खुला करण्याचे नियोजन आखण्यात आले होते.

मात्र आता हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 ला सर्वसामान्यांसाठी सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाबाबत मुंबईकरांचा भ्रमनिरास होणार आहे. तथापि हा प्रकल्प नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमटीएचएल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प केव्हा सुरू होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी अर्थातच 25 डिसेंबरला सुरू करण्याचे नियोजन होते.

मात्र या प्रकल्पाचे काम या नियोजित वेळेत होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प या वेळेत सुरू होणे अवघड आहे. मात्र आता हा प्रकल्प जानेवारी 2024 अखेरपर्यंत सुरू करण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबईमधील या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

परंतु हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच हा प्रकल्प 20 जानेवारी पूर्वी सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे प्रयत्न आमच्याकडून केले जाणार आहेत. त्यांनी या प्रकल्पाची मुख्य कामे, विशेषत: वाहतूक नियंत्रण आणि स्वयंचलित टोल वसुलीशी संबंधित कामे पूर्ण झालेली नसल्याची कबुली दिली आहे.

किती टोल लागणार

एका अधिकाऱ्याने महाराष्ट्र टाईम्स या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला सांगितले की, मुंबई ट्रांस हार्बर लिंकने प्रवास करण्यासाठी 500 रुपयांपर्यंतचा टोल आकारण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाने केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे प्रस्तावित केला होता.

पण राज्य शासनाने हा प्रस्ताव अवास्तव असल्याचे सांगितले आहे. म्हणून राज्य शासन या टोलसाठी चाळीस ते पन्नास टक्के सबसिडी देणार आहे. यामुळे टोल दरात मोठी कपात होणार आहे.

या प्रकल्पासाठी प्रस्तावित करण्यात आलेला टोलचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. या बैठकीत टोलदरात 40 ते 50 टक्के कपात करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा