केव्हा सुरू होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प ? MTHL उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MTHL Inauguration Date : मुंबईकरांचे 50 वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. लवकरच मुंबईमधील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 ला अर्थातच भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू केला जाणार होता.

मात्र हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार नसल्याने प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा एकदा लांबवण्यात आली आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 70च्या दशकापासून प्रयत्न केले जात आहेत.

सत्तरच्या दशकात मुंबईमधील वाहतूक कोंडी कमी करून मुंबई आणि नवी मुंबई परस्परांना जोडण्यासाठी एका सी ब्रिजची योजना आखण्यात आली होती. मात्र ही योजना गेली 5 दशकाच्या काळातही प्रत्यक्षात खरी उतरली नाही.

दरम्यान 2018 मध्ये मुंबई आणि नवी मुंबईला परस्परांना थेट रस्ते मार्गाने जोडण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्याला सुरवात झाली. म्हणजे मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. या अंतर्गत शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज विकसित केला जात आहे.

या प्रकल्पाचे काम सुरू होऊन जवळपास पाच वर्षांचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे. सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्याच्या काळात हा प्रकल्प आता सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार हा प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प 25 डिसेंबरला सुरू केला जाणार होता.मात्र नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता हा प्रकल्प नवीन वर्षात सुरू होईल.

जानेवारी 2024 च्या अखेरपर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले आहे. यामुळे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास मात्र 15 ते 20 मिनिटात पूर्ण होणार आहे.

दरम्यान मुंबई ट्रान्स हार्बर लिंकने प्रवास करताना आवश्यक असलेला टोल हा ओपन रोड टोलिंग सिस्टमच्या मदतीने कापला जाणार आहे. यामुळे या मार्गावर टोल देण्यासाठी गाडी थांबवावी लागणार नाही.

त्याचबरोबर फास्टॅग स्टिकर्सशिवाय वाहने न थांबवता टोल वसूल करण्याचे तंत्रज्ञान सुद्धा विकसित केले जात आहे. फास्टॅग सुविधेशिवाय वाहनचालकांकडून टोल वसूल करण्यासाठी परिवहन विभागासोबत हे तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा