MSRDC New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहे. अजूनही मोठमोठ्या महामार्गाची कामे सुरू आहेत. तर काही महामार्गांची कामे येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. असाच एक महामार्ग आहे विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर. राज्य रस्ते विकास महामंडळ विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका विकसित करणार आहे.
या प्रकल्पात अंतर्गत एकूण 126 किलोमीटर लांबीची मार्गीका विकसित होणार आहे. यासाठी जवळपास 19 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान या प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार असून याचे काम 11 पॅकेज मध्ये होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 29 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे. दरम्यान, एमएसआरडीसीने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे.
या अंतर्गत निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे. यामध्ये 14 नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. दरम्यान आता निविदा प्रक्रिया अंतिम करून लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्प अंतर्गत विकसित होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजसाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केलेल्या आहेत.
मात्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आचारसंहिता लागू आहे. यामुळे आता या प्रकल्पाची पुढील कारवाई ही लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पूर्ण होऊ शकणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया अंतिम केली जाईल आणि नियुक्त कंपन्यांना वर्क ऑर्डर दिले जाईल असे म्हटले जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधीच या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
हा मल्टी मॉडेल कॉरिडोर ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे. या प्रकल्पामुळे या तिन्ही जिल्ह्यातील विकासाला आणखी चालना मिळणार आहे.
हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून विधानसभा निवडणुकीच्या आधीच या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.