गुड न्युज आली रे ! ‘या’ उमेदवारांसाठी MPSC ने जाहीर केली मेगाभरती, रिक्त पदाच्या 510 जागा भरल्या जाणार, केव्हा सुरु होणार अर्ज ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Recruitment 2023 : एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील लाखो उमेदवार तयारी करत असतात. एमपीएससी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या खूपच अधिक आहे.

दरम्यान या लाखो उमेदवारांसाठी दिवाळीच्या पूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एमपीएससीने एक नवीन भरती जाहीर केली आहे. या पदभरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 510 जागा भरल्या जाणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची आणि आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

यासाठीची अधिसूचना देखील आयोगाच्या माध्यमातून निर्गमित झाली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज देखील मागवले जात आहेत. अशा परिस्थितीत, आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती ?

इलेक्ट्रिकल इंजिनिअर अर्थातच विद्युत अभियांत्रिकी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग अर्थातच स्थापत्य अभियांत्रिकी या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती पदे भरली जाणार ?

इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चे 15 आणि सिव्हिल इंजिनिअरिंग चे 495 अशी एकूण 510 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत अभियांत्रिकी या पदासाठी बी.ई. / बी. टेक. (इलेक्ट्रिकल आणि पॉवर), B.E. / बी. टेक.(इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर), बी.ई. / बी. टेक. ( ऊर्जा प्रणाली), B.E. / बी. टेक. (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर उमेदवार पात्र राहतील.

तसेच स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी बी.ई/बी टेक इन सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, बी.ई / बी टेक इन स्ट्रक्चरल, B.E. / B. Tech. (Civil and Environmental), B.E. / B. Tech. (Construction Engineering/Technology या विषयातील पदवीधर उमेदवार पात्र राहतील. तथापि याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचणे अपेक्षित आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 38 वर्ष पर्यंतचे उमेदवार पात्र राहतील. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष सूट दिली जाईल. म्हणजेच मागास प्रवर्गातील 43 वर्ष वयापर्यंतचे उमेदवार पात्र राहतील. सोबतच दिव्यांग उमेदवारांना सात वर्षे सूट दिली जाणार आहे. म्हणजेच 45 वर्षे वयापर्यंतचे दिव्यांग उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार आहेत.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करायचा आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करता येणार नाही.

अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार

या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. पण 7 नोव्हेंबर 2023 पासून यासाठी अर्ज सुरू होणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

21 नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार?

https://drive.google.com/file/d/1z-L0yl6X4eRXtxdXwKpFtZBYawTqputK/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1Y8Y3pV35Usqe1QRLAAyJptrbDhdZrklx/view?usp=drivesdk