Monsoon News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची आतुरता लागली होती तो मान्सून आता अंदमानात पोहोचला आहे. 19 मे ला मान्सून अंदमानात पोहोचला असल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तसेच भारतीय हवामान खात्याने 28 मे ते 3 जून या कालावधीत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, राज्यात मान्सून आगमनासाठी आणखी किती दिवस राहिले आहेत असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय हवामान खात्याने यावर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून आगमनाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच यंदा वेळेतच मान्सूनचे आगमन होणार आहे. परिणामी आता शेतकऱ्यांना आपल्या शेती कामांना वेग द्यावा लागणार आहे.
सध्या अनेक ठिकाणी शेतकरी बांधव जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी लगबग करत असल्याचे दिसत आहे. बी बियाणे, खतांसाठी देखील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान यंदा वेळेतच मान्सून आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला असल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या शेतीकामांना आणखी वेग द्यावा लागणार आहे.
खरे तर दरवर्षी मान्सूनचे 22 मे ला अंदमान मध्ये आगमन होत असते. पण यंदा अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात मानसून वेळे आधीच पोहोचला आहे. 19 मेला या भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. हवामान खात्याने यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानात पोहोचणार असा अंदाज व्यक्त केला होता.
यानुसार मान्सूनचे अंदमानत आगमन झाले असल्याने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. दरम्यान आता हवामान खात्याने 31 मे च्या सुमारास मान्सूनचे केरळात आगमन होणार असे म्हटले आहे. या जाहीर केलेल्या तारखे तीन ते चार दिवसांचा बदल अपेक्षित आहे.
म्हणजेच 28 मे ते 3 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सून पोहोचणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान हवामान तज्ञांनी जर मान्सूनसाठी आगामी काळातही अशीच पूरक परिस्थिती राहिली तर मान्सूनचे हवामान खात्याने सांगितलेल्या तारखेला केरळमध्ये आगमन होणार असा आशावाद व्यक्त केला आहे.
येत्या दहा दिवसांनी मान्सून केरळमध्ये येणे अपेक्षित आहे. केरळ मध्ये पोहोचल्यानंतर तेथून पुढे सहा ते सात दिवसांनी मान्सून आपल्या तळ कोकणात येणार आहे. तळकोकणात दाखल झाल्यानंतर 11 जूनला मान्सून मुंबईत सलामी देईल. यानंतर मग मान्सून पुढे सरकेल आणि 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.