Monsoon 2024 : गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रसहित देशातील अनेक भागांमध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी हिवाळ्यातच विहिरी कोरड्या झाल्यात.
आता तर अनेक ठिकाणी धरणांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे बळीराजाची चांगलीच चिंता वाढली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी एलनिनोच्या प्रभावामुळे ही बिकट परिस्थिती तयार झाली होती.
राज्यात जवळपास दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळाली. परिणामी 2024 चा मान्सून कसा राहणार याबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
यावर्षीही मान्सूनवर चा प्रभाव राहणार का, यंदा मान्सून काळात गेल्यावर्षीप्रमाणेच पावसाचा मोठा खंड पडणार का? असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत.
दरम्यान याच साऱ्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे ते डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी. हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा अर्थातच 2024 च्या मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ते म्हटलेत की एल निनो यंदा न्यूट्रल राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ला निना देखील सक्रिय होऊ शकतो असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
जर ला निना सक्रिय झाला तर निश्चितच यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले की, 4 मार्च ते 20 मे दरम्यानच्या तापमानाचा अंदाज घेतल्यास कोणत्या भागात कमी आणि कोणत्या भागात जास्त पाऊस पडू शकतो याचा अंदाज बांधत येतो.
यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या भागात चांगला पाऊस पडेल आणि कोणत्या भागात कमी पाऊस पडेल हे जाणून घेण्यासाठी जून महिन्याची वाट पहावी लागणार आहे. एक जून रोजी याबाबतचा सविस्तर अंदाज समोर येईल असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
एकंदरीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसोबत दगाफटका करणार नाही. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञांच्या माध्यमातून समोर येत आहे.
अनेक जागतिक हवामान संस्थांनी देखील यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. विशेष म्हणजे आता भारतीय हवामान तज्ञांनी देखील जागतिक हवामान संस्थेच्या अंदाजाला दुजोरा दिलाय.