Havaman Andaj : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान विभागाचा मान्सून 2024 चा पहिला अंदाज समोर आला आहे.
यामध्ये भारतीय हवामान खात्याने यंदा मानसून काळात पाऊसमान कसे राहणार आणि मान्सूनचे आगमन केव्हा होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने आपल्या मान्सून 2024 च्या दुसऱ्या अंदाजात यावर्षी देशात समाधानकारक पाऊस राहणार असे म्हटले होते.
यावर्षी मान्सून समाधानकारक राहील असा अंदाज स्कायमेट या संस्थेने दिला होता. यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे. अशातच आता हवामान खात्याने देखील मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन हे वेळेत होणार आहे. यंदा मान्सूनचे आगमन 8 जूनला होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने जारी केला आहे.
या आपल्या पहिल्या वहिल्या अंदाजात IMD ने 2024 च्या मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत सरासरीहून जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यात IMD ने 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊसच पाऊस राहणार असा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती आशादायी असून, दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. एकंदर आकडेवारी आणि वाऱ्याची स्थिती पाहता मान्सूनसाठी ही स्थिती पूरक असल्याचं महत्त्वाचे निरीक्षण आयएमडीने यावेळी नोंदवले आहे.
देशात जून ते सप्टेंबर हा काळ मान्सूनचा काळ असतो. या पावसाळी काळात किती पाऊस होणार यावरच खऱ्या अर्थाने देशातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असते. कारण की भारतातील निम्म्याहून अधिक शेती ही पावसाळ्याच्या पाण्यावर आधारित आहे.
दरम्यान, यंदा मान्सून काळात साधारण 87 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या अल निनोची परिस्थितीही सर्वसामान्य असून पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपलेला राहणार आहे.
त्यामुळे यावर्षी मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. एकंदरीत हवामान खात्याचा हा अंदाज शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे.