Monsoon 2024 : नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला आहे. आता मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मान्सून आगमनास आता फक्त दोन महिन्यांचा काळ बाकी आहे. यामुळे शेतकऱ्यांसहीत सर्वसामान्यांचे देखील मान्सून कडे लक्ष लागले आहे. यंदा मान्सून काळात पाऊसमान कसा राहणार ? हा मोठा सवाल आहे.
खरेतर गेल्यावर्षी अर्थात 2023 मध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे, शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. गेल्या मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने आत्तापासूनच अनेक ठिकाणी पाणीटंचाई पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक भागात आत्तापासूनच पाणीबाणी सारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशातच आता स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने मानसून २०२४ बाबत आपला नवीन सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे.
यामध्ये या खाजगी संस्थेने यंदा पाऊसमान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच कोणत्या राज्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस होऊ शकतो या बाबत अंदाज वर्तवला आहे. दरम्यान आज आपण स्कायमेंटचा हा हवामान अंदाज सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्कायमेटचा मान्सून २०२४ बाबतचा सविस्तर अंदाज
स्कायमेंटने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी मान्सून कालावधीत अर्थातच जून ते सप्टेंबर दरम्यान भारतात सामान्य मान्सून राहणार आहे. या काळात देशात 868.6 मिमीच्या दीर्घ सरासरीच्या (LPA) 102 टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा स्कायमेटने वर्तवली आहे.
Skymet ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, मध्य आणि पश्चिम भागात जून ते सप्टेंबरपर्यंत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार अशी शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण भागात सामान्य पाऊस पडेल आणि ईशान्य भारत आणि पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस होणार अशी शक्यता आहे.
भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडणार असा अंदाज आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात आणि मध्य प्रदेश सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा या संस्थेने वर्तवली आहे.
तसेच यंदाच्या पावसाळ्यात बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याचे देखील या अहवालात म्हटले गेले आहे. ईशान्य भारतात हंगामाच्या पहिल्या सहामाहीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
स्कायमेटने पुढे सांगितले की केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. देशाच्या मध्यवर्ती भागात मात्र सामान्य पाऊस पडणार आहे. एकंदरीत देशातील काही राज्यांमध्ये यंदा कमी पावसाची शक्यता आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात यावर्षी सामान्य मान्सूनची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज निश्चितच दिलासा देणारा ठरणार आहे.
अर्थातच गेल्या वर्षी जशी दुष्काळी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळाली तशी परिस्थिती यंदा राहणार नाही. ही बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आशादायी ठरणार आहे. तथापि, भारतीय हवामान विभाग एप्रिलमध्ये जारी करणाऱ्या आपल्या मान्सून बाबतच्या पहिल्या अंदाजात काय म्हणते याकडे देखील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.