Monsoon 2024 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात भीषण गर्मी पाहायाला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे देशभरातील जनता हैराण आहे. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष आता मान्सून कडे लागले आहे. बळीराजा अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. जून महिन्यात मोसमी पावसाला सुरुवात होते यामुळे राज्यभर शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.
पण, मानसून भारताच्या मुख्य भूमीत कधी प्रवेश करणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान मान्सून संदर्भात भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने यंदा देशात मान्सून काळात सामान्य ते अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मात्र असे असले तरी देशातील काही राज्यांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी राहणार अशीही माहिती हवामान खात्याने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सून संदर्भात माहिती देताना असे म्हटले आहे की देशातील जम्मू-काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मधील काही भागात यंदा कमी पाऊस पडणार आहे. या भागात सामान्य पेक्षाही कमी पावसाची शक्यता आहे.
याशिवाय यंदाच्या मान्सून काळात ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा प्रदेश, दक्षिण छत्तीसगड आणि ईशान्यमधील राज्यांच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण यंदा संपूर्ण देशाचा विचार केला असता देशात 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे यावर्षी जीवनातील सप्टेंबर या चार महिन्यांचा पावसाळी काळात राष्ट्रीय राजधानी दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह वायव्य भारतात सामान्य पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
या संबंधित राज्यांमध्ये एलपीएच्या 92 ते 108 टक्के एवढा पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे या भागात सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडणार असे म्हटले जात आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांत सामान्यपेक्षा अधिक पाऊस होणार असे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. एकंदरीत महाराष्ट्रात गेल्या वर्षी सारखी परिस्थिती राहणार नाही.
यावर्षी आपल्या राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. केरळमध्ये 31 मे आणि आपल्या महाराष्ट्रात आठ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज आहे. तसेच 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सक्रिय होईल असे देखील म्हटले जात आहे.