Monsoon 2024 : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.
बी बियाणे आणि खतांच्या खरेदीला देखील वेग आला आहे. दुसरीकडे शासन आणि प्रशासन देखील मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आले आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनसंदर्भात आढावा बैठक घेतली आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने देखील मान्सून संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे काल अर्थातच 28 मे 2024 ला मान्सूनची एक शाखा अरबी समुद्रात दाखल झाली आहे.
विशेष म्हणजे त्याची दुसरी शाखा देखील सक्रिय झाली असून तिचाही प्रवास वेगवान झाला आहे. ही दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह पूर्वोत्तरच्या राज्यांमध्ये आगामी 72 तासांत येणार असा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.
विशेष बाब अशी की बंगालच्या उपसागरात तयार झालेले मान्सूनपूर्व हंगामातील पहिले चक्रीवादळ आता निवळण्याच्या मार्गावर आहे. हे चक्रीवादळ बांगलादेशकडे सरकले आहे. तत्पूर्वी त्याने पश्चिम बंगालमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता.
आता मात्र या चक्रीवादळाचा वेग कमी झाला असून ते बांगलादेश कडे रवाना झाले आहे. हे वादळ बांगलादेशच्या उत्तरेस 90 किलोमीटरवर आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने जलद गतीने प्रवास केला आहे.
ही दुसरी शाखा पश्चिम बंगालसह आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या पूर्वोत्तर राज्यांत येत्या 72 तासात पोहोचणार आहे. अर्थातच मान्सूनची दुसरी शाखा येत्या 72 तासात भारताच्या मुख्य भूमीत पाय ठेवणार आहे.
याशिवाय मान्सून सध्या अरबी समुद्रात दाखल झाला असून तो देखील 72 तासात केरळमध्ये येणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
एकंदरीत मान्सूनच्या दोन्ही शाखा 31 मे ते एक जून या कालावधीत भारताच्या मुख्य भूमीत येणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची आतुरता होती ती आता संपणार असे चित्र आहे.
केरळात दाखल झाल्यानंतर मान्सून सात ते आठ दिवसात म्हणजेच आठ जूनच्या सुमारास आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्यातील तळ कोकणात सर्वप्रथम मान्सूनची एन्ट्री होईल आणि त्यानंतर मुंबई व संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.