Monsoon 2024 News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भागांमध्ये प्रचंड उष्णता आणि काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. वादळी पावसाचे सत्र गेल्या काही तासांपासून थोडेसे नरमले आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसाने उघडीप दिली असून तापमानात वाढ होत आहे. तापमानानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे.
देशातील काही भागांमध्ये तापमानाने तब्बल पन्नाशीचा आकडा ओलांडला आहे. सर्वाधिक तापमान राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात नमूद केले जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे या राज्यांमध्ये तापमान वाढ होत असल्याची माहिती दिली जात आहे.
मात्र आता उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला लवकरच थंडावा मिळणार आहे. कारण की भारतीय हवामान खात्याने देशभरातील नागरिकांना एक गुड न्यूज दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानाने भाजून निघालेल्या वसुंधरेला आता मान्सूनच्या पावसाची धार अनुभवायला मिळणार आहे. यामुळे माता वसुंधरा प्रसन्न होईल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळणार आहे.
भारतीय हवामान खात्याने मान्सून आगमनाची शुभ वार्ता दिली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन बुलेटिन मध्ये येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे.
खरे तर याआधी आयएमडीने 31 मे ला मानसून केरळात पोहोचणार असे म्हटले होते. आता मात्र आगामी काही तासात मान्सून केरळमध्ये येणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. तथापि हा प्राथमिक अंदाज आहे.
मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण हवामान खात्याने अंदाज वर्तवताना तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात असे म्हटले होते.
यानुसार आता हवामान खात्याने येत्या काही तासात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज दिला आहे. सध्या मान्सूनच्या प्रवासासाठी खूपच पोषक परिस्थिती आहे.
जर तो अशाच वेगानं पुढे येत राहिला तर काही तास आधीच केरळची वेस ओलांडू शकतो. दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात म्हणजेच 31 मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्यानं तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनीचं ही माहिती दिली आहे.