Monsoon 2024 : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला. सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्रात जवळपास 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.
यामुळे सध्या बळीराजा आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशा या विपरीत परिस्थितीत मान्सून 2024 कसा राहणार, जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात समाधानकारक पाऊस पडणार का? हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान या संदर्भात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाने मोठी माहिती दिली आहे. अमेरिकन हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे एलनिनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात कमी होणार आहे.
प्रशांत महासागरातील एलनिनोची परिस्थिती लवकरच निवळणार असल्याने येत्या मान्सून काळात सामान्य पाऊस बरसणार असा अंदाज आहे. एलनिनोचा प्रभाव डिसेंबर 2023 पासून हळूहळू कमी होऊ लागला आहे.
तसेच येत्या काही महिन्यात हा प्रभाव पूर्णपणे निवळणार आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडणार अशी आशा आहे. अमेरिकन हवामान विभागाप्रमाणेच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील यंदा भारतात चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
काही हवामान तज्ञांनी देखील असेच मत व्यक्त केले आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने आगामी मान्सून बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याचे सांगितले आहे.
याचाच अर्थ यंदा महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात चांगला पाऊस होणार आहे. निश्चितच जर असे झाले तर संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
मान्सून काळात चांगला समाधानकारक पाऊस झाला तर शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. यामुळे आता या हवामान संस्थांचा अंदाज खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
उद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार
भारतीय हवामान खात्याने उद्यापासून अर्थातच 9 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. नऊ ते 11 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आयएमडीने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार असे बोलले जात आहे.