मोठी बातमी ! देशातील ‘या’ भागामध्ये अतिवृष्टी; आता किती दिवस अन कुठं पडणार जोराचा पाऊस, महाराष्ट्रात कसं राहणार हवामान? IMD चा नवीन अंदाज काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon 2023 : मान्सून जाता-जाता चांगलाच दणका देण्याच्या मूडमध्ये आहे. खरंतर, गेल्या दोन-तीन दिवसांपासून देशातील हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. आपल्या राज्यातही हवामानात बदल झाला असून काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

विशेष म्हणजे काल उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे.  उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही भागात काल जोराचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सटाणा आणि देवळा या भागात काल पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऑक्टोबर हिटने परेशान जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण देशातील काही भागांमध्ये अजूनही उन्हाचे चटके चांगलेच तापदायक ठरत आहेत. तर काही ठिकाणी आता हिवाळ्याला देखील सुरुवात झाली आहे. काही भागात थंडीची चाहूल लागली असून यामुळे संपूर्ण देशभरात मिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, मान्सूनचा विचार केला असता अद्याप संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरलेला नाही.

महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमध्ये अजूनही मान्सून सक्रियच आहे. परंतु येत्या काही दिवसांमध्ये मानसून पूर्णपणे माघारी फिरेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच आज 18 ऑक्टोबर रोजी देशातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या भागात बरसणार पाऊस ?

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 18 ऑक्टोबर 2023 रोजी राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण खूप मोठा पाऊस पडणार नाही. फक्त हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तसेच पुढील दोन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाळी वातावरण कायम राहील अशी महत्त्वाची माहिती देखील आय एम डी ने दिली आहे. याशिवाय आज राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परंतु मुंबई ठाण्यासह राज्यातील काही भागात उन्हाचे चटके बसतच राहतील असे देखील सांगितले जात आहे. याशिवाय राजस्थान, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात मान्सून जाता-जाता पुन्हा एकदा बसणार असल्याचे चित्र तयार होत आहे.