Nitin Gadkari News : पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणेकरांना एक मोठ गिफ्ट दिल आहे. वास्तविक पाहता पुण्याच्या बाबतीत एका म्हणीचा मोठा उपयोग केला जातो ती म्हणजे पुणे तिथे काय उणे.
निश्चितच शिक्षणाच्या या माहेरघरात कसलीच उणीव भासत नाही. अलीकडे तर ट्रॅफिकची म्हणजेच वाहतूक कोंडीची देखील पुण्यात उणीव भासत नाही. वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या, वाढतं शहरीकरण यामुळे कधीकाळी शांत आणि गोंगाट मुक्त शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता वाहतूक कोंडीचे माहेरघर बनू पाहत आहे.
यामुळे शहरात अपघातांची मालिका देखील कायम आहे. दरम्यान आता शासन प्रशासनाकडून वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय शोधला जात आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते विकासाची बहुसंख्य कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान आता केंद्रीय रस्त्याने वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहरात नवीन चार उड्डाणपुले विकसित केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
सोबतच बहुचर्चित अशा चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाबाबत देखील मोठी माहिती एका पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे. नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा ते खेड,तळेगाव ते चाकण, हडपसर ते दिवेघाट आणि वाघोली ते शिरुर या चार मार्गावर फ्लाय ओव्हर तयार केले जाणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता राजधानीत ‘वंदे भारत लोकल’ ट्रेन धावणार; रेल्वे मॅनेजरची माहिती
हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा ते खेड हा २९ किलोमीटरचा मार्ग राहणार असून यासाठी आठ हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. तळेगाव ते चाकण ५४ किमीसाठी ११ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हडपसर ते दिवेघाट १२ किमी मार्गासाठी ८२३ कोटीचा खर्च लागणार आहे आणि वाघोली ते शिरुर ५६ किमी मार्गासाठई १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं आहे.
यासोबतच गडकरी यांनी चांदणी चौकातील नवीन उड्डाणंपुलाच्या उद्घाटनाची तारीख सांगितली आहे. गडकरी यांच्या मते एक मे रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी या पुलाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करकमलाद्वारे या पुलाचे उद्घाटन होणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ ठिकाणी थांबणार; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली मंजुरी
दस्तूर खुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनीच या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाबाबत माहिती दिली असल्याने पुणेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यासोबतच मंत्री महोदय यांनी पुणे शहरासह जिल्ह्यात एकूण 53 हजार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. यामध्ये पुणे अहमदनगर, पुणे नाशिक, पुणे सोलापूर, तसेच पुणे रिंग रोडच्या कामांचा समावेश आहे.
निश्चितच, पुणे शहरातील बहुप्रतिष्ठित असा चांदणी चौकातील नवीन उड्डाणपूल एक मे रोजी सुरू होणार असल्याने याचा मोठा फायदा शहरातील नागरिकांना होईल असा दावा केला जात आहे. या पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि सध्या स्थितीला सुरू असलेली अपघातांची मालिका कुठे ना कुठे थांबेल असा आशावाद देखील व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी ! ‘या’ ठिकाणी निघाली मोठी भरती; तब्बल साडेतीनशे रिक्त जागा भरल्या जाणार, पहा सविस्तर