शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी; ‘या’ हायटेक मिनी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे शेतीकाम होणार आणखी सोपे, किंमतही बजेटमध्ये, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mini Tractor News : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही शेतकरी कुटुंबात तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर अलीकडे पारंपारिक पिकांच्या शेतीसोबतच शेतकऱ्यांनी नगदी आणि फळ पिकांची शेती सुरु केली आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने त्यांनी आता फळबागा लावल्या आहेत. फळबागांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न विक्रमी वाढले आहे.

डाळिंब, सिताफळ, संत्रा, द्राक्ष इत्यादी पिकांची लागवड आपल्या महाराष्ट्रात वाढली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या फळ पिकांच्या शेतीतून चांगली कमाई देखील होत आहे. मात्र फळबागा लागवड करणे आणि या फळबागा जोपासणे हे खूपच आव्हानात्मक काम असते. डाळिंब, द्राक्ष सारख्या फळ पिकांमध्ये फवारणी, मशागत, छाटणी इत्यादी कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजूर लावावे लागते.

मात्र, फळबागायतदार शेतकऱ्यांचे बहुतांशी कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने होऊ लागली आहेत. मशागतीची आणि फवारण्याची कामे आता ट्रॅक्टरमुळे सोपी झाली आहेत. यामुळे आता राज्यातील बहुतांशी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे. दरम्यान, जर तुम्हीही फळबागांसाठी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की, आज आपण एका हायटेक मिनी ट्रॅक्टरच्या विशेषता आणि किंमत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मिनी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे शेतीकाम आणखी सोपे होणार आहे. हा ट्रॅक्टर फक्त फळबागांसाठीच उपयुक्त ठरतो असे नाही तर इतरही शेतीची कामे या ट्रॅक्टरच्या सहाय्याने करता येतात. फळ बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेचं छोट्या शेतकऱ्यांसाठी देखील हा ट्रॅक्टर फायदेशीर ठरणार आहे.

कोणता आहे तो ट्रॅक्टर

आम्ही ज्या मिनी ट्रॅक्टर बाबत बोलत आहोत तो स्वराज कंपनीचा आहे. स्वराज 724 एक्सएम असे त्याचे नाव आहे. हा ट्रॅक्टर अल्प कालावधीत शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनला आहे. हा 1824 सीसी क्षमतेचा 2 सिलिंडर इंजिनवाला mini tractor आहे. हा 25 HP चा ट्रॅक्टर आहे. म्हणजे या ट्रॅक्टरचे इंजिन 25 हॉर्स पावरची पावर जनरेट करते. हा ट्रॅक्टर शेतीमधील सर्व प्रकारची कामे करण्यास सक्षम आहे. विशेषता फळबागांसाठी हा ट्रॅक्टर उपयुक्त राहणार आहे. फवारणी, मशागत, खत लावणे, माल वाहून घेऊन जाणे यांसारख्या विविध कामांसाठी हा ट्रॅक्टर फायदेशीर ठरेल.

या ट्रॅक्टरला 3-स्टेज ऑइल बाथ टाईप एअर फिल्टर देण्यात आले आहे. यामुळे याचे इंजिन जास्त गरम होत नाही. तसेच धुळीमुळे याचे इंजिन देखील खराब होत नाही. या ट्रॅक्टरचे जास्तीत जास्त पीटीओ 22 एचपी आहे, ज्यामुळे शेतीमध्ये वापरली जाणारी उपकरणे जसे की नागर, रोटावेटर इत्यादी सहजपणे चालवता येतात. याची लोडिंग क्षमता ही जवळपास 1000 किलो एवढी आहे. म्हणजेच हा ट्रॅक्टर शेतमालाच्या वाहतुकीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.

Mini Tractor चे फिचर्स आहेत खूपच भन्नाट 

या ट्रॅक्टरला मेकॅनिक टाईप स्टीयरिंग दिलेले आहे. याला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्स आहेत. या ट्रॅक्टरची ब्रेकिंग सिस्टम देखील खूपच कमाल आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर हेवी ड्युटी सिंगल ड्राय प्लेट प्रकार, 280 मिमी व्यासाचा क्लचसह येतो. स्वराज 724 XM ट्रॅक्टरमध्ये मल्टी स्पीड प्रकारचा पॉवर टेकऑफ आहे, जो 540/1000 RPM जनरेट करतो. मात्र हा मिनी ट्रॅक्टर फोर व्हील ड्राईव्ह नाही टू व्हील ड्राईव्ह आहे.

यामुळे जर तुम्हाला फोर विल ड्राईव्ह हवा असेल तर तुम्हाला दुसरा ट्रॅक्टर शोधावा लागू शकतो. या ट्रॅक्टरचे पुढचे टायर 6.00 x 16 चे आहेत आणि मागचे टायर 12.4 x 28 साईजचे आहेत. याला अॅडजस्टेबल सीट पण मिळते. याचा ग्राउंड क्लिअरन्स 375 एमएम एवढा आहे. या ट्रॅक्टरचा वेग हा जवळपास 28 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. रिव्हर्ससाठी 11 किलोमीटर प्रतितास एवढा याचा स्पीड आहे.

किती आहे किंमत?

आता सर्वात मोठा प्रश्न येतो तो किमतीचा. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत ही 3.75 ते 4 लाखाच्या घरात आहेत. म्हणजेच पावणे चार लाख ते चार लाखाच्या आसपास या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत आहे. शेतकरी मित्रांनो ही एक्स शोरूम किंमत आहे म्हणजेच तुम्हाला या किमतीत हे ट्रॅक्टर मिळू शकत नाही. या ट्रॅक्टरची ऑन रोड प्राईस जी असेल त्या किमतीत तुम्हाला हा ट्रॅक्टर मिळेल.

कोणत्याही वाहनाची ऑन रोड प्राईस ही शहरानुसार बदलत असते. यामुळे जर तुम्हाला या ट्रॅक्टरची ऑन रोड प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला या कंपनीच्या डीलर सोबत संपर्क साधावा लागणार आहे. तसेच वॉरंटीबाबत बोलायचं झालं तर या ट्रॅक्टर साठी कंपनीकडून 200 तास आणि दोन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. तथापि या ट्रॅक्टरच्या संपूर्ण विशेषतः समजून घेण्यासाठी आणि किमती बाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपणास या कंपनीच्या अधिकृत डीलर सोबत संपर्क साधावा लागणार आहे.  

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा