चक्रीवादळाचा साईड इफेक्ट महाराष्ट्रावर ! अहमदनगर, सोलापूर, लातूर, नांदेडसह या जिल्ह्यात बरसणार वादळी पाऊस, IMD काय म्हणतंय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Michaung Cyclone : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालय. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर गारपीट देखील झाली होती.

गेल्या महिन्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पाऊस बरसला होता.

दरम्यान, या चालू महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे चक्रीवादळात परावर्तित झाला असल्याने याचे साईड इफेक्ट आता आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळत आहेत.

मिचँग या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या हंगामातील तिसऱ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे मलभ गडद होत आहे. या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.

तसेच याचे साईड इफेक्ट आपल्या राज्यात देखील पाहायला मिळतायत अन राज्यात देखील अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.

राज्यातील मराठवाडा विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

परिणामी राज्यातील शेतकरी रडकुंडीवर आले आहेत. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान अवकाळी पावसाने उघडीप द्यावी आणि पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

अशातच आता भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. आज मराठवाडा आणि विदर्भ विभागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. नांदेड, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, लातूर या भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार अस IMD ने सांगितले आहे.

यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा