Mhada News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे एक घर असावे असे स्वप्न असेल. काही जणांनी हे स्वप्न पूर्ण केले असेल तर काहीजण अजूनही या स्वप्नाचा पाठलाग करत असतील. मात्र या स्वप्नाच्या घरांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करूनही अनेकांना यश मिळत नाही.
पैशांची जमवाजमव होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अलीकडे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शिवाय महागाई देखील दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नोकरदार वर्गाकडे येणारा पैसा महिन्याअखेरपर्यंत संपून जातो. म्हणून पैशांची बचत होत नाहीये.
परिणामी सर्वसामान्य नागरिक आपल्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देणाऱ्या म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर मुंबई , पुण, अमरावती, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरात गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात घरांच्या किमती कोट्यावधींच्या घरात आहेत. अशा स्थितीत Mhada आणि Cidco यांच्याकडून विकसित होणाऱ्या घरांनाच नागरिकांकडून पसंती दाखवली जात आहे.
दरम्यान जर तुम्ही छत्रपती संभाजी नगर मध्ये घर घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी Mhada ने एक गुड न्यूज दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर मध्ये एक नवीन गृह प्रकल्प उभारला जाणार आहे.
या गृहप्रकल्प अंतर्गत एकूण चार हजार पाचशे सदनिका तयार केल्या जाणार आहेत. यामुळे हजारो लोकांची स्वप्नातील घरांची स्वप्नपूर्ती या निमित्ताने होणार आहे. छत्रपती संभाजी नगरमधील ऑरिक सिटी येथे हा गृहप्रकल्प उभा केला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ऑरिक सिटी येथे म्हाडाचा हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रस्तावित प्रकल्प अंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे बांधली जाणार आहेत. म्हाडाला मात्र हा प्रकल्प उभारण्यासाठी 7.50 हेक्टर जमीन विकत घ्यावी लागणार आहे. ओरिक सिटी मध्ये नागरी वसाहतींसाठी विकसित जमीन आहे यामुळे ही जमीन म्हाडाला विकत घेणे अपेक्षित आहे.
यानंतर मग म्हाडा कडून जवळपास साडेचार हजार घरांचा गृहप्रकल्प विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कामगारांसाठी इथे एक स्मार्ट सिटी उभारण्यात येईल असं सांगितलं जात आहे. विशेष असे की यासाठी म्हाडाने शासनासोबत पत्रव्यवहार देखील सुरू केला आहे.
यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागेल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे. निश्चितच छत्रपती संभाजी नगर मध्ये हा गृहप्रकल्प उभा झाला तर याचा अनेकांना फायदा होणार आहे. यानिमित्ताने शहराचा आणखी विकास होईल आणि नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.