म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! Mhada ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय, नागरिकांना मिळाला मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : गेल्या काही दशकात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नवी मुंबई यांसारख्या भागात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपले स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी अडचणी येत आहेत.

नोकरदार वर्गाला मुंबई, पुण्यासारख्या शहरात घर घेणे म्हणजे अलीकडे अशक्य वाटू लागले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक राजधानी मुंबई, पुण्यासारख्या महानगरात घर घेण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची नागरिकांकडून नेहमीच आतुरतेने वाट पाहिली जात असते. Mhada वेळोवेळी घरांसाठी लॉटरी जारी करत असते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नुकतेच म्हाडाच्या पुणे आणि कोकण मंडळांने लॉटरी जाहीर केली आहे. Pune मंडळाबाबत बोलायचं झालं तर पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील घरांसाठी मंडळांने या वर्षातील नवीन लॉटरी जाहीर केली आहे. पुणे मंडळांने या भागातील 5,863 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. दरम्यान, पुणे लॉटरीबाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय पुणे मंडळाच्या लॉटरीत अर्ज करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी खूपच खास राहणार आहे. खरतर, सध्या पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. 5 सप्टेंबरपासून या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात नागरिकांनी या सोडतीला अपेक्षित असा प्रतिसाद दाखवला नव्हता. यामुळे या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

सुरुवातीला 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण या मुदत नागरिकांनी म्हणावा असा प्रतिसाद दाखवला नाही. यामुळे आता 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आता इच्छुकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज करता येणार आहे.

यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी आतापर्यंत 45 हजाराहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. आता आपण पुणे मंडळाच्या लॉटरीचे सुधारित वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार नवीन वेळापत्रक ?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या सोडतीसाठी ३० ऑक्टोबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम भरता येणार आहे.

प्रारूप यादी केव्हा जारी होणार : या सोडतीची प्रारूप यादी 8 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता माडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाणार आहे.

अंतिम यादी केव्हा जारी होणार : पात्र अर्जदारांची अंतिम यादी 20 नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

लॉटरी केव्हा निघणार : या सोडतीअंतर्गत 24 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढली जाणार आहे.