म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढलेली महागाई, वाढलेले इंधनाचे दर वाढलेले बिल्डिंग मटेरियल चे भाव या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नातील घरांच्या किमती आता वाढल्या आहेत. यामुळे अनेक लोकांना आपल्या ड्रीम हाऊसचे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येत आहेत.

अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आपल्या स्वप्नातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करत असतात. सध्या म्हाडा कोकण मंडळाकडून आणि पुणे मंडळाकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे मंडळाने काढलेल्या लॉटरी बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर पुणे मंडळांने पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. 5863 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. दरम्यान या लॉटरीसाठी सुरू असलेल्या अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता पुणे मंडळाच्या 2023 मधील या नवीन लॉटरीसाठी 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या लॉटरीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान आता आपण म्हाडा पुणे मंडळांने लॉटरीसाठी 30 ऑक्टोबर पर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृती मुदतवाढ दिली असल्याने याचे नवीन सुधारित वेळापत्रक कसे राहील याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे असेल नवीन वेळापत्रक

अर्ज विक्री आणि स्वीकृतीची अंतिम दिनांक : पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांसाठी आता 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

प्राप्त अर्जांची यादी केव्हा प्रसिद्ध होणार : आठ नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता ही यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

स्वीकृत अर्जाची अंतिम यादी केव्हा प्रसिद्ध होणार : २० नोव्हेंबर 2023 रोजी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडा पुणे मंडळ प्रसिद्ध करणार आहे.

संगणकीय सोडत केव्हा निघेल : या लॉटरीची संगणकीय सोडत 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता निघणार आहे.