म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ने घेतला ‘हा’ निर्णय, आता….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, पुणे यांसह विविध शहरांमध्ये मालमत्तेची किंमत मोठी वाढली आहे. स्थावर मालमत्ता कोणतीही असो त्याच्या किमतीत गेल्या काही वर्षांच्या काळात मोठी वाढ झाली आहे. घर, फ्लॅट, इमारत, जमीन प्लॉट यांच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

यामुळे अनेक लोक गुंतवणुकीसाठी आता रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळू लागले आहेत. अनेकांनी घर, फ्लॅट, जमिनीत गुंतवणूक केली आहे. याचा परिणाम म्हणून याच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत.

कमी होत चाललेले जमिनीचे क्षेत्र आणि वाढत असलेली लोकसंख्या यामुळे जमिनीची किंमत ही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. म्हणून आता सर्वसामान्य लोकांना मुंबई, पुण्यासारख्या शहरात घर घेणे म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे असे वाटू लागले आहे.

साहजिकच शहरांमध्ये घरांच्या किमती वाढत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिक आता परवडणाऱ्या दरातील घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. यासाठी सर्वसामान्य नागरिक सिडको आणि म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात.

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या तरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. म्हाडाच्या घरांच्या विक्रीसाठी मात्र लॉटरीची प्रक्रिया असते. दरम्यान म्हाडाच्या पुणे मंडळांने देखील 5863 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

यासाठी पाच सप्टेंबर पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ मिळाली आणि अखेर कार 60 हजार नागरिकांनी या सोडतीसाठी अर्ज सादर केले आहेत.

पण या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी केव्हा निघणार? हा सवाल गेल्या काही दिवसांपासून अर्जदार व्यक्तींच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान, या अर्जदार लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे मंडळाच्या सोडतीबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

या 5863 घरांच्या विक्रीसाठी आता 5 डिसेंबर 2023 रोजी पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे संगणकीय लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काढली जाणार अशी माहिती समोर आली आहे.

कुठं किती घर

या म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५,४२५ घरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ६९ घरे, सांगली जिल्ह्यातील ३२ घरे व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ घरे या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

दरम्यान या 5863 घरांसाठी 60 हजार लोकांनी अर्ज सादर केले असून आता या 60 लोकांपैकी लॉटरीत यशस्वी ठरलेल्या लोकांचे घराच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती होणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा