Mhada News : ठाणे वसई पालघर कल्याण नवी मुंबई सानपाडा विरार या भागात घराचं स्वप्न असणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई व उपनगरात दिवसेंदिवस घराच्या किमती आकाशाला गवस निघालात आहेत, अशा परिस्थितीत मुंबई उपनगरात घर घेणाऱ्या नागरिकांचे प्रामुख्याने म्हाडाच्या घरांकडे लक्ष लागून असते.
म्हाडा परवडणाऱ्या दरात नागरिकांना घर उपलब्ध करून देत असल्याने याकडे नागरिकांचे लक्ष लागून असते. अशातच आता म्हाडाकडून नागरिकांना एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल साडेचार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार आठ मार्चपासून या लॉटरीचा शुभारंभ होणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, विदर्भ, खानदेश, औरंगाबाद, जालना, हिंगोली या जिल्ह्यात एवढे दिवस पाऊस पडणार अन गारपीट…!
प्रधानमंत्री आवास योजना, समावेशक योजना तसेच कोकण मंडळाच्या घरांचा देखील यामध्ये समावेश राहणार आहे. या घरांची लॉटरी मात्र मे महिन्यात निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरांच्या किमती ह्या 13 लाखापासून ते 25 लाखापर्यंत राहणार आहेत. निश्चितच मुंबई व उपनगरात घरांची शोधाशोध करणाऱ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे. 8 मार्चपासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि 10 एप्रिल पर्यंत अर्ज करता येईल. मात्र अनामत रक्कम भरण्यासाठी 12 एप्रिल पर्यंतचा कालावधी दिलेला राहील.
यानंतर 28 एप्रिल पर्यंत संबंधितांना हरकती घेता येणार आहेत. यानंतर 10 मे रोजी या घरांची सोडत म्हणजेच लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह याठिकाणी राहणार आहे. ही लॉटरी मात्र विखुरलेल्या घरांसाठी राहणार आहे. यामध्ये सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1456 घरांचा समावेश असेल. ठाणे, पालघर, कल्याण, वसई, नवी मुंबई, सानपाडा आणि विरार या भागात ही घरे राहतील.
म्हाडा कोकण मंडळाची मात्र 166 घरे यामध्ये राहणार आहेत. ही घरे रायगड, कल्याण, पेण, अंबरनाथ, बदलापूर, सिंधुदुर्गमध्ये घरे आणि भूखंड राहतील. मात्र कोकण मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत 2048 घरे राहणार आहेत.
यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कल्याण येथील शिरढोण आणि खोणी, ठाणे येथील गोठेघर, विरार येथील बोळींज येथे देखील घरे असतील यांचा देखील या लॉटरीमध्ये समावेश असेल. अशा पद्धतीने तब्बल साडेचार हजार घरांसाठी ही लॉटरी राहणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! कांदा उत्पादकांना क्विंटलमागे मिळणार ‘इतकं’ अनुदान; ‘या’ दिवशी जाहीर होणार अनुदान, वाचा सविस्तर