Mhada News : मुंबई, पुणे यांसारख्या महानगरात सर्वसामान्यांना घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणं अशी गत झाली आहे. या महानगरातील उंच उंच इमारतींप्रमाणेच या महानगरात सर्वसामान्यांच्या घराच्या किमती देखील उंच उंच गगन भरारी घेत आहेत. परिणामी या महानगरात घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छनारे बहुतांशी सर्वसामान्य कुटुंब म्हाडाच्या घरांची वाट पाहत असते.
दरम्यान आता म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घर सोडत संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता पुणे मंडळाअंतर्गत सहा हजार 58 घरांची सोडत काढण्यात आली आहे. यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची मुदत मात्र आज संपली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे मंडळा अंतर्गत या घर सोडतीसाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दाखवला आहे. जवळपास 46 हजार अर्ज यासाठी म्हाडाकडे करण्यात आले आहेत.
हे पण वाचा :- Mhada News : मोठी बातमी ! म्हाडाच्या घरासाठीच्या अनामत रक्कमेत मोठी वाढ; आता भरावी लागणार ‘इतकी’ रक्कम
आज अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक होती. आज रात्री बारा वाजेपर्यंत अनामत रकमेसह नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहे. म्हणजेच आणखी काही अर्जांची भर यामध्ये पडण्याची शक्यता आहे. यामुळे या घर सोडतीसाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखवल्याचे चित्र आहे. एकीकडे पुणे मंडळांतर्गत घर सोडते साठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे तर औरंगाबाद मंडळाबाबत मात्र परिस्थिती भिन्न आहे.
या ठिकाणी नागरिकांकडून घर सोडतीसाठी अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद मंडळाने 936 घरांसाठी सोडत काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून झाली आहे. जरी 9 फेब्रुवारीपासून या घर सोडतच्या अर्जसाठी सुरुवात झाली असली तरी देखील आत्तापर्यंत मात्र 218 लोकांनी अनामत रकमे सह अर्ज सादर केले आहेत. यामुळे निश्चितच थंड प्रतिसाद या घर सोडतिला लाभत असल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- MHADA News : ब्रेकिंग; म्हाडा लवकरच देणार सर्वसामान्यांना खुशखबर ! ‘या’ विभागात निघणार तब्बल 1 लाख घरांची सोडत; वाचा सविस्तर
दरम्यान पुण्याच्या सहा हजार 58 घर सोडतसंदर्भात विचार करायचा झाला तर एकूण 65000 हुन अधिक लोकांनी यासाठी अर्ज केला. परंतु अनामत रकमेसह मात्र 46,402 लोकांनी अर्ज सादर केला आहे. आज रात्री 12:00 वाजेपर्यंत पुणे मंडळाच्या या घर सोडतीसाठी अनामत रकमे सह अर्ज सादर करण्याची मुदत आहे. यामुळे यामध्ये काही अर्जांची अजून भरू होईल मात्र तरी देखील फार मोठी यामध्ये वाढ होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
या सहा हजार 58 घरांपैकी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत तीन हजार दहा घर सोडत साठी काढण्यात आली आहेत. या घरांना मात्र कमी प्रतिसाद मिळाला आहे. या घरांसाठी केवळ 2356 अर्ज सादर झाले आहेत. यापैकी 1737 घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे अशा घरांची सोडत नव्याने जारी होण्याची शक्यता आहे.
तसेच औरंगाबादच्या घर सोडतसंदर्भात विचार करायचा झाला तर यासाठी 13 मार्च पर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. आतापर्यंत 503 लोकांनी यासाठी अर्ज केले आहेत पण केवळ 218 लोकांनीच अनामत रकमेसहं आपला अर्ज पाठवला आहे. निश्चितच औरंगाबाद मंडळ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या घर सोडतीसाठी नागरिकांनी थंड प्रतिसाद दाखवला आहे.
मात्र अजून बराच कालावधी या अर्ज प्रक्रियेसाठी शिल्लक असल्याने येत्या काही दिवसांत यामध्ये मोठी वाढ देखील होऊ शकते. तूर्तास मात्र नवीन प्रणालीमुळे घर सोडत साठी अर्ज करताना नागरिकांना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. परंतु ही नवीन प्रणाली नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वेसाठी ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास दिला नकार; आता काम थांबणार का?