मोठी बातमी ! म्हाडाने ‘या’ लॉटरी बाबत घेतला महत्वाचा निर्णय, आता….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada New Lottery 2023 : गेल्या काही दशकात पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये घराच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. यामुळे स्वतःच्या हक्काचे घर बनवणे आता पुण्या-मुंबईसारख्या शहरात अवघड बाब बनत चालली आहे. इंधनाचे वाढलेले दर, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढलेली महागाई या सर्व पार्श्वभूमीवर आता घरांच्या किमती वाढत आहेत.

अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा उभारताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता प्रत्येकालाच रोख रक्कम देऊन घर खरेदी करता येत नाही.

यामुळे अनेक जण गृहकर्जाचा पर्याय स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. तसेच खाजगी विकासकांकडील घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा आणि सिडकोच्या गृहप्रकल्पांमधील घर खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.

म्हाडाकडून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हाडाच्या पुणे मंडळाने सुद्धा पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली आहेत.

पुणे मंडळाने या भागातील 5863 घरे लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या लॉटरीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून यामध्ये हजारो लोकांनी अर्ज केले आहेत. दरम्यान पुणे मंडळाच्या या 5863 घरांच्या लॉटरी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट हाती आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 24 नोव्हेंबरला म्हणजे आज या घरांच्या विक्रीसाठी सादर झालेल्या अर्जांची काढली जाणारी संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. ही संगणकीय सोडत काही प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र ही संगणकीय सोडत आता केव्हा निघणार याबाबत म्हाडा पुणे मंडळाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

पण अर्जदारांना सोडतीचा नवीन दिनांक एस एम एस द्वारे कळवला जाईल अशी माहिती मंडळाच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे. या सोडतीसाठी 5 सप्टेंबर पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली होती. या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला नागरिकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला असून यासाठी 60,000 अर्ज प्राप्त झाले आहेत.

गेल्या काही सोडतींच्या तुलनेत या सोडतीसाठी नागरिकांनी कमी प्रतिसाद दाखवला आहे. तथापि पुणे मंडळाच्या या 5863 घरांसाठी हजारो अर्जदारांनी अर्ज केले असून आता या अर्जदारांपैकी काही यशस्वी अर्जदारांना स्वतःचे, हक्काचे घर मिळणार आहे.  

लॉटरीत कोणत्या भागातील किती घरे ?

पुणे मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सोडतीत पुणे जिल्ह्यात ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यात ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यात ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यात ३३७ सदनिका समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

तसेच पुणे मंडळांने काढलेल्या 2023 मधील या नवीन सोडतील म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ घरांचा समावेश करण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा