Mhada Mumbai Lottery News : गेल्या काही दिवसांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या योजनेसाठी लॉटरी केव्हा निघणार? याबाबत घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती. दरम्यान, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी गृहनिर्माण विकास मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या या हजारो घरांच्या योजनेसाठी 14 ऑगस्ट रोजी लॉटरी निघणार असल्याची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे ही लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की म्हाडाच्या या चार हजार 82 घरांच्या संगणकीय सोडतीसाठी एक लाख वीस हजार 244 अर्जदार पात्र ठरले आहेत. आता या लाखों लोकांपैकी विजेत्यांची लॉटरीने निवड होणार आहे.
ही लॉटरी 14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दोन वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी काढली जाणार आहे. निश्चितच या ठिकाणी प्रत्येकच अर्जदाराला थांबता येणार नाही अशा परिस्थितीत Mhadaच्या माध्यमातून ही लॉटरी वेब कास्टिंग थ्रो सर्वांना लाईव्ह दाखवली जाणार आहे. दरम्यान आज आपण ही वेब कास्टिंग लिंक कुठे पाहता येणार? तसेच या 4 हजार 82 घरांसाठी विजेत्या ठरलेल्या लोकांची यादी कुठे पाहता येणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर, अर्जदारांना लॉटरी पाहता यावी यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या आवारात एलईडी स्क्रीन लावून देण्यात आल्या आहेत.
म्हणजे ज्या लोकांना नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी जाऊन लॉटरी पाहण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी देखील तिथे विशेष सुविधा राहणार आहे. तसेच ज्या लोकांना तिथे जाऊन लॉटरी पाहता येणे अशक्य असणार आहे अशा लोकांसाठी वेब कास्टिंग थ्रो लाईव्ह लॉटरी दाखवली जाणार आहे.
कुठं मिळणार वेब कास्टिंगची लिंक
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा मुंबई मंडळाच्या 2023 च्या या लॉटरीची वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी जाहीर केली जाणार आहे. ही लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच या लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार अशी माहिती देखील मंडळाच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.