MHADA Lottery : ठाणे, वसई विरार, घनसोली मध्ये म्हाडांच्या घर सोडतीची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण मंडळ अंतर्गत 4752 घरांची सोडत काढण्यात येणार असून यासाठीच वेळापत्रक जाहीर झाल आहे. पंतप्रधान आवास योजना, खाजगी विकासकांची घरे आणि म्हाडाची घरे अशी एकूण चार हजार 752 घरांची सोडत 11 एप्रिल रोजी काढली जाणार आहे.
विशेष म्हणजे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून आजपासून अर्ज मागवले जात आहेत. NEFT आणि RTGS च्या साह्याने अनामत रकमेसह घरासाठी चा अर्ज 20 मार्चपर्यंत सबमिट करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या घर सोडतीसाठी अर्ज नोंदणी ही 5 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे.
तसेच आज पासून अर्जाची विक्री सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ही 20 मार्च 2023 ठेवण्यात आली आहे. तसेच सादर झालेल्या अर्जाची स्वीकृतीची अंतिम यादी पाच एप्रिल 2023 ला सार्वजनिक होणार आहे.
आणि प्रत्यक्ष सोडत ही 11 एप्रिल 2023 रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण म्हाडाच्या या घर सोडतीसाठी अर्ज करताना कोणते कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत या महत्त्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत.
अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे
मोबाईल क्रमांक :- आधार कार्ड सोबत संलग्न असलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. लॉटरीची संबंधित सर्व माहिती या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठवली जाणार आहे. याशिवाय अर्जदाराला आपला ईमेल देखील सादर करावा लागणार आहे.
आधार कार्ड :- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. आधार कार्डवर सध्या स्थितीला वास्तव्यास असलेल्या ठिकाणाचा पत्ता असणे मात्र अनिवार्य राहणार आहे. तसेच अर्ज सादर करताना आधार कार्डची दोन्ही बाजूच्या सुस्पष्ट प्रति अपलोड कराव्या लागतील. यासोबतच अर्जदार विवाहित असल्यास आपल्या जोडीदाराचे आधार कार्ड देखील अर्ज सादर करताना अपलोड करावे लागणार आहे. अर्जदाराचा जोडीदार हा म्हाडाच्या घरांसाठी सहमालक असतो यामुळे त्याचे देखील आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक असते.
पॅन कार्ड :- अर्जदाराचे पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करावे लागेल. सोबतचं जोडीदाराचे पॅन कार्ड अपलोड करावे लागेल.
अधिवास प्रमाणपत्र :- म्हाडाच्या घरांसाठी महाराष्ट्रात पंधरा वर्षे वास्तव्यास असलेल्या लोकांनाच अर्ज सादर करता येतो. जर महाराष्ट्रात पंधरा वर्षे अधिवास नसेल तर अशा व्यक्तींची नावे लॉटरी मधून वगळली जातात. यामुळे अधिवास प्रमाणपत्र म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना सादर करावे लागते. विशेष म्हणजे हे अधिवास प्रमाणपत्र 2018 नंतर काढलेले असावे. तसेच या प्रमाणपत्रावर बारकोड असणे आवश्यक आहे.
आयटीआर :- अर्ज करण्यासाठी आयटीआर देखील लागणार आहे. जोडीदाराच्या आयटीआरचीं देखील पावती अपलोड करावी लागणार आहे.
उत्पन्नाचा पुरावा :- उत्पन्नाचा दाखला देखील अपलोड करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यावर देखील बारकोड असला पाहिजे.
जात प्रमाणपत्र :- म्हाडाच्या घर सोडती साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांना कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करावे लागेल.