Mhada Lottery 2023 Pune Division : मुंबई पुणे नासिक औरंगाबाद यांसारख्या महानगरात घरांच्या किमती दिवसेंदिवस महागत असल्याने नागरिक म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची कायमच वाट पाहत असतात. म्हाडा नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची लॉटरी ही काढत असते. दरम्यान पुणे मंडळाकडून 2023 च्या सुरुवातीला घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती.
याच घर सोडत संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. पुणे मंडळाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या घरांच्या सोडतीसाठीची पहिली प्रारूप यादी किंवा चेकलिस्ट आता जाहीर झाली आहे. यामुळे आज आपण ही प्रारूप यादी कशा पद्धतीने बघायची याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. वास्तविक सुरुवातीला पुणे मंडळाकडून 5990 घरांसाठी सोडत करण्यात आली.
यामध्ये मात्र नंतर 68 घरे आणि भूखंड वाढवण्यात आलीत आणि घरांची एकूण संख्या 6058 इतकी बनली. लॉटरीसाठी ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ईच्छुक नागरिकांना अर्ज करण्यास सांगितले गेले. म्हाडाच्या नवीन ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून यासाठी अर्ज करावयाचा होता. या नवीन प्रणालीमुळे मात्र अनेकांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या यामुळे म्हाडाने एक ते दोनदा यासाठी मुदतवाढ दिली.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे मंडळाच्या या घर सोडतीसाठी एक लाख 16 हजार लोकांनी नोंदणी या ठिकाणी केली होती. यापैकी मात्र पात्र अर्जांची संख्या केवळ 65 हजार 770 इतकीच राहिली. म्हणजेच अर्ज वेरिफाय केल्यानंतर 65,770 लोक यासाठी पात्र ठरले. मात्र अनामत रक्कम केवळ 46 हजार 400 लोकांनीच भरली.
दरम्यान आता या 46,400 लोकांपैकी 6,058 लोकांची निवड होणार आहे. लॉटरीच्या माध्यमातून ही निवड होईल पण तत्पूर्वी पहिली प्रारूप यादी म्हाडाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. आता म्हाडाची प्रारूप यादी कशी बघायची याविषयी आपण जाणून घेणार आहोत. म्हाडाची पुणे मंडळाच्या 6058 घरांसाठीची प्रारूप यादी पाहण्यासाठी https://housing.mhada.gov.in/ या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर आपल्या पुढ्यात म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल.
त्या ठिकाणी होम पेजवर menu मध्ये आपणांस जायचे आहे. मेन्यू मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी published applications या पर्यायावर आपणास क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढ्यात view accepted applications आणि view rejected applications असे दोन पर्याय दिसतील. यामधील पहिल्या पर्यायात पात्र ठरलेले अर्जदार व्यक्तींची नावे राहतील आणि दुसऱ्या पर्यायात अपात्र व्यक्तींची नावे राहणार आहेत.
हे पण वाचा :- होमलोन घेण्याचा विचार करताय? मग, एचडीएफसी देतय तुम्हाला झटपट गृहकर्ज; अर्ज करण्याची पद्धत, पात्रता वाचा