Marigold Farming : गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता देशभरातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवायला सुरुवात केली आहे. आता शेतकरी केवळ पारंपारिक पिकांची लागवड करत नसून फळबाग आणि फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात आपल्या देशात लागवड केली जात आहे.
फुल शेतीमध्ये झेंडूची लागवड प्रामुख्याने केली जाते. झेंडूच्या फुलांना बाजारात कायमच मागणी असल्याने या फुल पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. विशेषता दसरा आणि दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांना अभूतपूर्व मागणी येते. येत्या काही महिन्यात दिवाळीचा पर्व सुरू होणार आहे.
या दिवाळीला झेंडूच्या फुलांना नेहमीप्रमाणे मागणी राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना झेंडूची लागवड या वर्षी फायदेशीर ठरणार असे सांगितले जात आहे. मात्र कोणत्याही पिकाच्या शेतीतून ज्याप्रमाणे त्याच्या सुधारित वाणाची लागवड करणे आवश्यक असते झेंडूच्या लागवडीत देखील तसंच काहीस आहे.
या पिकाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी झेंडूच्या सुधारित जातींची शेती करणे जरुरीचे राहते. अशा परिस्थितीत आज आपण झेंडूच्या दोन सुधारित प्रजातींची आणि त्या अंतर्गत येणाऱ्या जातींची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
झेंडूच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
आफ्रिकन झेंडू : हा एक झेंडूचा सुधारित प्रकार आहे. या प्रजातीच्या झेंडूंची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. झेंडूच्या या प्रजातींची झाडे एक मीटर उंचीपर्यंत वाढतात. या प्रजातीच्या झेंडूच्या फुलांचा रंग पिवळा आणि केशरी असतो. पुसा ऑरेंज, पुसा स्प्रिंग आणि आफ्रिकन येलो या काही प्रमुख जाती या प्रजातीमध्ये येतात. या जातींची शेती करून शेतकरी चांगले उत्पादन मिळू शकतात.
फ्रेंच झेंडू : आफ्रिकन प्रजातीप्रमाणेच फ्रेंच झेंडूची देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या प्रजातींच्या झाडांना खूप जास्त फुले लागतात. रेड ब्रॉकेट, क्यूपीड येलो, बोलेरो, बटन स्कॉच इत्यादी जाती या प्रजाती अंतर्गत येतात. या देखील सुधारित जातींची लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन मिळू शकतात.