Maratha Reservation Breaking News: अखेर तिसऱ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे (Sambhaji Raje)यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलन स्थळी दाखल होत राजेंची भेट घेतली. त्यानंतर या नेत्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. माझी खासदारकी लोकांच्या विकासासाठी आहे. माझ्या खासदारकीवर टीका झाली. मी आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला. त्यानंतर इतर खासदारांनीही पाठिंबा दिला.
राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही आणला.
राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचं नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.