Mango News: यंदा आंबा काढणी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर यावर्षी उत्पादनातील केवळ 20 ते 25 टक्के उत्पादनच बागायतदारांच्या पदरी पडणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याचा परिणाम हा सर्वाधिक फळबागांवर झाला आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंब्याची उत्पादन घटले आहे.तर हापुस आंब्याला जगभरातून मागणी असते.
आंबा काढणीच्या काळात अतिवृष्टी, गारपीट थंडीचा फटका आणि आता काढली दरम्यान झालेला अवकाळी पाऊस .त्यात आंब्याचे उत्पादन तर घटलेच आहे. पण त्यात बाजारात आंब्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे.हे पहाणे देखील गरजेचे आहे. कारण उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम दरावर होणार आहे.
यंदाच्या वर्षी हापूस बाजारात येण्यास उशीर झाला असला, तरी त्याचा मात्र मुंबई बाजारपेठेत श्रीगणेशा झाला असून मार्केटमध्ये 1 लाख पेट्यांची हापूस आंब्याची आवक झाली.तर 10 हजार पेट्यांची निर्यात आखाती देशांमध्ये दुबई, कुवेत, ओमन देशात करण्यात आली आहे.
आतापर्यंत कोकणातील आंब्याची चव सर्वांनी चाखली पण आता उत्पादकच अडचणीत आला असून सरकारने मदत करावी अशी अपेक्षा रत्नागिरीतील शेतकरी व्यक्त केली आहे.