Maize Rate : मका (Maize Crop) हे महाराष्ट्र समवेतच भारतात उत्पादित केलं जाणारं एक खरीप हंगामातील (Kharif Season) महत्त्वाचे पीक आहे. मक्याची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते.
खरं पाहता मक्याचे पीक एक शाश्वत पीक म्हणून ओळखले गेले आहे. मात्र अलीकडे हवामान बदलामुळे मका पिकाला देखील मोठा फटका बसत आहे. दरम्यान प्रमुख मका उत्पादक पट्ट्यामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे मका उत्पादनात थोडी का होईना घट होणार आहे.
मका पीक सध्या कणीस पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत सुरू असलेला हा पाऊस मका उत्पादनात घट घडवून आणू शकतो. मात्र असे असले तरी सध्या देशांतर्गत मक्याचे बाजार भाव (Maka Bajar Bhav) चांगलेच दबावात असल्याचे चित्र आहे. दरम्यान अमेरिकेच्या कृषी विभागाने देखील यंदा जागतिक मका उत्पादन घटणार असल्याचा दावा केला आहे. या वर्षी अमेरिकेत कधी नव्हे असा दुष्काळ जाणवत आहे.
यामुळे मका पिकाला देखील अमेरिकेत मोठा फटका बसला आहे. दुष्काळामुळे अमेरिकेत मका उत्पादन (Maize Production) घटणार आहे. मात्र भारत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी भारतात मका (Maize Farming) उत्पादन वाढणार आहे. गेल्या हंगामात 226 लाख टन मका उत्पादन झाले होते मात्र या हंगामात यामध्ये मोठी वाढ होणार असून जवळपास 232 लाख टन मका उत्पादन होणार असल्याचा आकडा समोर आला आहे.
मात्र काही जाणकार लोकांच्या मते, परतीच्या पावसामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून मका पिकाचे उत्पादन कमी राहणार आहे. मात्र असे असले तरी मक्याचे बाजार भाव दबावात राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे पशुखाद्य उद्योगाकडून मक्याची मागणी कमी झाले आहे. जाणकार लोकांच्या मध्ये सध्या सोयाबीन पेंड आणि तांदळाचा दर कमी झाला असल्याने सोयाबीन पेंड आणि तांदळाचा वापर पशुखाद्य उद्योगात वाढला असेल.
यामुळे मक्याची मागणी पोल्ट्री उद्योगात तसेच पशुखाद्य उद्योग मध्ये कमी झाली आहे. या एका कारणामुळे मक्याचे बाजार भाव कमी झाले आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनला उच्चांकी बाजार भाव मिळत असल्याने मक्याला चांगली मागणी आली होती. मात्र या वर्षी सोयाबीन कमी दरात उपलब्ध होत असल्याने मक्याची मागणी कमी झाली आहे.
परिणामी मक्याचे बाजार भाव कमी आहेत. मात्र असे असले तरी सध्या मक्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल ते 2300 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते हाच बाजार भाव आगामी काही दिवस टिकून राहणार आहे.