आता फक्त ‘एवढेच’ वीजबिल रोखीने भरता येणार, जास्तीचे बिल असेल तर ऑनलाइनच पेमेंट करावं लागणार; वीजबिलात 500 रुपयांची सूटही मिळणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Electricity Bill : महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि कामाची बातमी समोर येत आहे. घरगुती तसेच व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी ही बातमी विशेष कामाची आहे. खरंतर अलीकडे संपूर्ण देशात डिजिटल पेमेंटला पसंती दिली जात आहे. कॅश पेमेंट पेक्षा डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित असल्याने रोकड विरहित व्यवहारासाठी अर्थातच डिजिटल व्यवहारासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे.

शासनाच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट साठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. दरम्यान आता विज बिल ऑनलाईन भरण्यासाठी देखील ग्राहकांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्युत नियामक आयोगाने याबाबतचा आदेश देखील निर्गमित केला आहे. आयोगाच्या या आदेशानुसार आता एक ऑगस्ट पासून महावितरणचे बिल रोखीने भरण्यासाठी कमाल रक्कम ठरवण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान महावितरण विज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने विज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. विद्युत नियामक आयोगाच्या नवीन आदेशानुसार आता वीज ग्राहकांना फक्त पाच हजार रुपयांपर्यंतचे वीज बिल रोख भरता येणार आहे. यापेक्षा अधिक बिल असल्यास ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने बिल भरणे अनिवार्य राहणार आहे.

याची अंमलबजावणी एक ऑगस्ट पासून करण्यात येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 31 मार्च रोजी विद्युत नियामक आयोगाने एका आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार एक ऑगस्टपासून लघुदाब कृषी वर्गवारी सोडून सर्व वीज ग्राहकांना पाच हजार रुपयांपर्यंतच विज बिल रोख भरता येणार आहे.

यापेक्षा अधिक वीज बिल असल्यास मात्र ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे. लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना मात्र दहा हजार रुपयांपर्यंतच बिल रोख भरता येणार आहे. यापेक्षा अधिक बिल असल्यास यादेखील ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे. हे बिल भरण्यासाठी महावितरणकडून आरटीजीएस व एनईएफटीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन पेमेंट केल्यास विज बिलात सूट मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने विज बिल भरणा निशुल्क आहे. एवढेच नाही तर ऑनलाईन पद्धतीने विज बिल भरल्यास बिलाचे 0.25 टक्के आणि जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंतची सूट म्हणजे सवलत दिली जाणार आहे.

ऑनलाइन विज बिल कुठं भरणार

राज्यातील वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल भरता येणार आहे. तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे देखील बिल पेमेंट करता येणार आहे. वीजदेयकाचा भरणा क्रेडिट / डेबिटकार्ड, नेटबँकिंग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत देखील केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर भारत बिल पेमेंटने सुद्धा वीजबिल भरले जाऊ शकते.

निश्चितच ऑनलाईन विज बिल भरण्यासाठी ग्राहकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे जरी ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आदेश देण्यात आले असले तरी देखील ग्राहकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. या उलट अशा पद्धतीने पेमेंट केल्यास ग्राहकांचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचणार आहेत.