20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान, अवकाळी पाऊस पडणार का ? भारतीय हवामान विभागाने स्पष्टच सांगितल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात देखील रूपांतर झाले.

मात्र यामुळे महाराष्ट्रात कोणताच विपरीत परिणाम झालेला नाही. राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अवकाळी पाऊस पडणार कां? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भारतीय हवामान विभागाने या वादळाच्या प्रभावामुळे राज्यात कुठेच अवकाळी पाऊस बरसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात कसे हवामान राहणार या संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी तीन-चार दिवस राज्यातील किमान तापमानात घटणार आहे.

राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने यावेळी वर्तवला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आता गारठा वाढणार आहे. पुन्हा एकदा राज्याला गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे.

तसेच आय एम डी ने सध्या महाराष्ट्रावर कोणतीच हवामान विषयक प्रणाली कार्यरत नसल्याचे सांगितले आहे. यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान पाहायला मिळत आहे तसेच आगामी तीन दिवस देखील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. 23 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमधील किमान तापमान घटनार आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडा गारठा अधिक राहणार आहे. तथापि, 23 नोव्हेंबर नंतर परिस्थिती बदलणार असे सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात 24 तारखेला काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठं पडणार अवकाळी पाऊस 

भारतीय हवामान विभागाने राज्यात 24 नोव्हेंबरला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे, २३ नोव्हेंबरपासून राज्यात आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांमध्ये कमाल तापमान किंचित वाढणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कमाल तापमानात 23 नोव्हेंबर नंतर थोडीशी वाढ होईल.

यामुळे दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार होईल आणि २४ नोव्हेंबरला दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने यावेळी वर्तवला आहे. सोबतच अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकंदरीत 23 नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर 24 नोव्हेंबरला राज्यातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.