शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार नाही ? पुणे हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. जुलैमध्ये अक्षरशा पावसाचा त्राहिमाम पाहायला मिळत होता. गेल्या महिन्यात जास्तीच्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यातून पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाचा जोर कमी झाला असल्याने ज्या भागात पूरस्थिती तयार झाली होती तेथील परिस्थिती आता सामान्य बनली आहे.

मात्र पावसाने अचानक ब्रेक लावल्याने शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढू लागली आहे. याचं कारणही तसं खासच आहे. खरंतर मान्सून सुरू होण्यापूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाने यंदा एल निनोमुळे भारतात दुष्काळ पडणार असे भाकीत व्यक्त केले होते. दरम्यान अमेरिकेच्या या अहवालाला भारतातील अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनी दुजोरा दिला होता.

विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने देखील एल निनोचे सावट राहणार मात्र पाऊस कमी पडणार नाही असे स्पष्ट केले होते. यामुळे आता गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने आणि हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस राहणार असा अंदाज व्यक्त केला असल्याने हे दुष्काळाचे संकेत तर नाहीत ना? अशी चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगत आहे.

पावसाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाअवस्था असून शेतकऱ्यांचा बांधापासून ते कृषी विभागाच्या कार्यालयापर्यंत आणि कृषी तज्ञांमध्ये सध्या पावसाबाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. अशातच पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर आगामी चार दिवसाचा हवामान अंदाज दिला आहे. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 10 ऑगस्टपर्यंत कुठेच तीव्र पावसाची शक्यता नाही.

यामुळे राज्यातील कोणत्याच जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी झालेला नाही. पण आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलका ते मध्यम पाऊस होणार अशी शक्यता आहे. आज अर्थातच 7 ऑगस्ट रोजी राज्यातील विदर्भातील चार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पण उर्वरित जिल्ह्यात पावसाचा कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही नाही. यामुळे आता दहा ऑगस्टनंतर हवामान कसे राहते याकडे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात 15 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता 15 ऑगस्ट नंतर खरंच पाऊस पडणार का? डख यांचा अंदाज खरा ठरणार का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. एकंदरीत राज्यात आणखी सात ते आठ दिवस पाऊस पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा