महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही ? ‘या’ दिवसापासून वाढणार पावसाचा जोर, हवामान विभागाने थेट तारीखच सांगितली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. मात्र जवळपास 17 ते 18 दिवसाचा पावसाचा खंड पाहता शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची आतुरता लागली आहे. बऱ्याच दिवसांपासून पावसाने खंड पाडला असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मका, एवढेच नाही तर डाळिंब, द्राक्ष यांसारख्या फळबाग पिकांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.

शेती पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. राज्यावर मोठे पाणी संकट उभे राहिले आहे. आगामी काळात पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठ्या मरण यातना सहन कराव्या लागणार असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत आता मोठा पाऊस पडला तेव्हाच दुष्काळाच्या उंबरठ्यावर आलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर ऑगस्ट महिन्यात एलनिनोची तीव्रता कमी होती.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवाय इंडियन ओशियन डायपोल देखील तटस्थ अवस्थेत होता. मात्र तरीही ऑगस्ट महिन्यात मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे जर एल निनोची तीव्रता वाढली तर महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार का? हाच मोठा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसासंदर्भात आत्ताच एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल 28 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

परंतु राज्यात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. दरम्यान आता इंडियन ओशियन डायपोल सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 29 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील पुणे, सातारा, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सऱ्या पडतील अशी शक्यता आहे. याचा अर्थ आज राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

पण आज मध्य रात्री नंतर हवामानात बदल होण्याची शक्यता असून उद्या 30 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या बुधवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर सांगली आणि सातारा, तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील दिला आहे.

तसेच उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे.

एकंदरीत उद्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. परंतु उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार आहे. दरम्यान, काही हवामान तज्ञांनी राज्यात 8 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढू शकतो आणि चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज बांधला आहे.