Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या शेती पिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला यावेळी जाणकार लोकांनी दिला आहे. खरंतर कोकणात आणि विदर्भात भात पिकाची हार्वेस्टिंग सुरु आहे.
काही ठिकाणी हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशा या परिस्थितीत अवकाळी पाऊस बरसला तर भात पिकाचे अतोनात असे नुकसान होणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस परतला होता.
राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. पण त्यानंतर महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस थांबला होता. आता मात्र पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
आगामी 3 दिवसांत राजधानी मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण उर्वरित भागात हवामान कोरडं राहणार असे हवामान विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
हवामान खात्याने भारतात आता पावसाचा नवीन पर्व सुरु झाला असल्याचे सांगितले आहे. यावेळी भारतातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालू शकतो. राज्यातील मुंबई, पुणे कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय राजधानी दिल्ली-एनसीआर परिसर आणि अंदमान आणि निकोबार बेटावर देखील पावसाची हजेरी लागणार अशी शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्यातील संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच पावसाचा अंदाज घेऊनच कामाचे नियोजन करावे लागणार आहे.