ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठा पाऊस पडणार की नाही? हवामान विभागाने 31 ऑगस्टपर्यंतच्या हवामान अंदाजात काय म्हटलं?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : सध्या राज्यातील खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. यामुळे सध्या खरीप हंगामातील सोयाबीन समवेतच सर्व मुख्य पिकांना पावसाची नितांत आवश्यकता आहे. सध्या सोयाबीन फुलोरा अवस्थेत आले आहे. अशा परिस्थितीत पिकाला पाण्याची गरज आहे.

पण गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने सोयाबीनचे पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. सोयाबीन, कापूस समवेतच खरीप हंगामातील सर्वच पिकांसाठी शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची गरज भासू लागली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने 31 ऑगस्ट पर्यंतचा आपला सुधारित हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या हवामान अंदाजात भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात मोठा पाऊस पडणार की नाही याबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे.

ऑगस्ट महिन्यात मोठा पाऊस पडणार का?

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील विदर्भ व संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज आहे.

यानंतर 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस होणार असा अंदाज आहे. या काळात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत पडणारा पाऊस मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा कमी राहू शकतो असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तसेच पुढील सात दिवस मध्य महाराष्ट्रासहित पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रात देखील मोठा पाऊस पडणार नसल्याचे हवामान विभागाने यावेळी नमूद केले आहे.

एकंदरीत, या चालू ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत कुठेच मुसळधार पाऊस झाला नाही आणि आता पुढेही मुसळधार पाऊस होणार नाही असे चित्र तयार होत आहे. यामुळे निश्चितच खरीप हंगामातील पिकांना फटका बसू शकतो, उत्पादनात घट येऊ शकते अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.