पुढील पाच दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? अवकाळी पाऊस हजेरी लावणार ? IMD ने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत होती. मात्र आता राज्यातील थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. राज्यातील किमान तापमान थोडेसे वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे.

हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तरेकडील राज्यांमधील किमान तापमान थोडेसे वाढले असल्याने आणि त्या ठिकाणी थंडीचा जोर थोडासा कमी झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रातही थंडीचा जोर काहीसा कमी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कालपासून भारतातील अनेक राज्यांमधल किमान तापमान वाढले आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंडमधील विविध भागांमधील किमान तापमान किंचित वाढले आहे.

येथील अनेक भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नमूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात येणारे थंड वारे कमी झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील गारठा कमी झाला आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात आगामी पाच दिवस कसे हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आगामी पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. विशेष म्हणजे आता राज्यातील थंडीचा जोर थोडा थोडा कमी होईल असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

आगामी पाच दिवस राज्यात कुठेच अवकाळी पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.

सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील किमान तापमान हे 10 अंश सेल्शियसच्या वर आहे. खरेतर डिसेंबर महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली होती.

तसेच डिसेंबरच्या अखेरीस काही भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून समोर येत होता. मात्र आता आयएमडीने पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे सांगितले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा